किती ही अधोगती! पूज्य गायीवर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ देखील बनवला

पशुधनावर अनैसर्गिक अत्याचार : व्हिडिओ व्हायरल; विकृताला पोलिसांनी केले जेरबंद
किती ही अधोगती! पूज्य गायीवर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ देखील बनवला
Published on
Updated on

सातपूर : सातपूर गावातील भाजी मंडईच्या परिसरात शुक्रवारी (दि. ३०) रात्रीच्या सुमारास पशुधनावर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एका विकृताला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याविरुद्ध नवीन कायद्यानुसार प्राण्यांचा छळ प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Animal cruelty case)

सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातपूर गावातील भाजी मंडईत एकाने पशुधनावर अनैसर्गिक कृत्य करीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याअनुषंगाने सामाजिक कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी संबंधित इसमाला त्वरित अटक करावी, यासाठी सातपूर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. व्हिडिओत दिसणाऱ्या इसमाच्या वर्णनावरून सातपूर पोलिसांनी संशयित चक्रधर ठाकरे (२६, रा. मोखाडा) यास ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली. ठाकरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढीलतपास पोलिस करत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news