Dr. M. Visvesvaraya : आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैया

१८८५ मध्ये सरकारच्या आमंत्रणावरून तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पी.डब्ल्यू.डी. खात्यात नाशिक येथे सहायक इंजिनिअर म्हणून ते रुजू झाले होते.
Dr. M. Visvesvaraya
Dr. M. Visvesvaraya : आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरैयाFile Photo
Published on
Updated on

The architect of modern India, Bharat Ratna Dr. Mokshagundam Visvesvaraya

काही माणसे हिमालयासारखी असतात. जवळ गेल्याशिवाय त्यांची उंची आणि भव्यता याचे आकलन होत नाही. आधुनिक भारताला आकार देणाऱ्या थोर विभूतीपैकी एक भारतरत्न इंजिनिअर डॉ. एम. विश्वेश्वरैया भारतमातेचे केवढे महान सुपुत्र होते, हे अभ्यासानंतरच कळते. आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे विश्वेश्वरैया यांचे मूळ गाव. त्यांबा जन्म १४ एप्रिल १८६० रोजी कर्नाटकातील मुद्देन-हळ्ळी येथे झाला. बंगळुरू येथे शालेय शिक्षण आणि मद्रास विद्यापीठातून पदवी घेतल्यावर पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. त्या काळी पुण्याच्या 'डेक्कन क्लब'च्या स्थापनेत त्यांचा सक्रिय पुढाकार होता. १८८५ मध्ये सरकारच्या आमंत्रणावरून तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पी.डब्ल्यू.डी. खात्यात नाशिक येथे सहायक इंजिनिअर म्हणून ते रुजू झाले होते.

Dr. M. Visvesvaraya
Lasalgaon Onion : लासलगावहून ८४० टन कांदा चेन्नईला रवाना

१ ८८९ मध्ये वयाच्या केवळ २९ व्या वर्षी भारतीय सिंचन आयोगाच्या सदस्यपदी त्यांची नेमणूक झाली, दख्खनच्या पठारावरील सिंचनाच्या ब्लॉक पद्धतीचे जनक म्हणूनही ते ओळखले जातात धरणाध्या स्वयंचलित दारांचे आरेखन मांहून त्याचे पेटंट त्यांनी घेतले. या दारांमुळे धरणाला धोका निर्माण न होता त्याची साठवणक्षमता वाढवणे शक्य होणार होते. अशा प्रकारच्या दारांचा पहिला वापर १९०३ मध्ये महाराष्ट्रात खडकवासला येथे करण्यात आला. पुढे ग्वाल्हेरच्या दिग्रा आणि म्डसूरच्या कृष्णराजसागर चरणातही अशी दारे वापरण्यात आली. कोल्हापूर येथील लक्ष्मी म्हणजे राधानगरी धरणासाठीही त्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले होते. १९०६-०७ मध्ये भारत सरकारतर्फे एडन येथील पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या अभ्यासासाठी ते गेले होते. तेथील पाणीपुरवठा व ड्रेनेज योजनेला त्यांचे मार्गदर्शन लाभले.

१९०८ मध्ये वयाच्या ४८ व्या वर्षी विश्वेश्वरैयांनी इंग्रजांच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली, इथून पुढे त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्याला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अमेरिका, कॅनडा, रशिया, इजिप्त इत्यादी देशांचे दौरे करून तेथील औद्योगिक प्रकल्पांचा अभ्यास केला. काही काळ ते निजामाच्या हैदराबाद संस्थानात चीफ इंजिनिअर होते. हैदराबाद शहराला मुसा नदीच्या पुरामुळे होणाऱ्या उपद्रवावर उपाय करून त्यांनी ती समस्या सोडवली. विशाखापट्टणम बंदरास सागरी क्षरण क्रियेमुळे निर्माण होऊ लागलेला धोका टाळण्यासाठी त्यांनी योग्य त्या उपाययोजना सुचवल्या. १९०९ मध्ये म्हैसूर संस्थानाने त्यांना कावेरी नदीवरील कृष्णराजसागर भरणाचे मुख्य अभियंता म्हणून आमंत्रित केले. मौसूरजवळचा हा प्रकल्प भारतातील अनेक धरणांसाठी दिशादर्शक ठरला, होस्पेट येथील तुंगभद्रा धरणासही त्यांचे मार्गदर्शन लाभले.

Dr. M. Visvesvaraya
Sharad Pawar : आरक्षणासंदर्भात सर्वसमावेशक भूमिका हवी

१९१२ मध्ये विश्वेद्यरैया यांना म्हैसूर संस्थानाचे मुख्य दिवाण (सहणजे पंतप्रधान) म्हणून आमंत्रित करण्यात आले. १९१२ ते १८ अशी सात वर्षे त्यांनी या पदावर कार्य केले. शिक्षण, अर्थ, बैंकिंग, उद्योग, ब्यापार, रस्ते, रेल्वे अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी नव्या संस्था व प्रकल्प उभारून मूलभूत बदल घडवून आणले. अल्प कालावधीत आधुनिकीकरण करून त्यांनी म्हैसूर संस्थानाचा अक्षरशः कायापालट घडवून आणला त्याचमुळे त्यांना आधुनिक मौसूरचे जनक मानले जाते. १९१८ मध्ये से म्हैसूरच्या दिवाणपदावरून स्वेच्छेने निवृत झाले. पण नंतरही विविध ठिकाणी त्यांचे कार्य व मार्गदर्शन सुरूच होते, १९३२ मध्ये पूर्ण झालेली व तत्कालीन सिंध प्रांतातील सुकूर या गावाला सिंधू नदीतून पाणीपुरवठा करणारी योजना तयार करण्याचे कार्य विश्वेश्वरैया यांनी केले होते. डॉ. राजेंद्रप्रसाद सेतू (पूर्वीचा मोकामा पूल) हा उत्तर व दक्षिण विहारला जोडणारा गंगेवरील महत्त्वाचा पूल आहे. १९५९ मधील या पुलाच्या उभारणीत विश्वेश्वरैया यांचे मार्गदर्शन लाभले होते. १९२७ ते १९५५ पर्यंत म्हणजे वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत ते टाटा स्टीलच्या संचालक मंडळावर होते.

अनेक क्षेत्रांत त्यांनी एवढे महत्वाचे योगदान दिले की, एकाच व्यक्तीने एकाच आयुष्यात इतके कार्य केले आहे, यावर विश्वास बसू नये. १९१७ मध्ये त्यांनी बंगशुरू येथे भारतातील पाहिले शासकीय अभियांत्रिकी कॉलेज स्थापन केले. पुढे भारतात प्रसिद्ध झालेला म्हैसूर सामण (म्मौसूर सोप), मौसूर चंदन उद्योग, भद्रायतीचा म्हैसूर लोह उद्यद्योग, अनेक बँका, व्यापारी प्रतिष्ठाने, मुद्रण उद्योग, वृत्तपत्रे यांच्या उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला. म्हैसूर रेल्वे, तिरुमला तिरुपती येथील रस्ता इ. ची उभारणी त्यांच्याव योजनेनुसार करण्यात आली होती. त्यांच्या नावावर आठ महत्त्वाचे पंथ असून, त्यापैकी भारताची उभारणी व ग्रामीण भारताचे औद्योगिकीकरण हे दोन ग्रंथ आजही दिशादर्शक आहेत.

१९०६ मध्ये त्यांना दिल्ली दरबारात 'कैसर-ए-हिंद' हा किताब, तर १९१५ मध्ये 'नाइट कमांडर ऑफ दि ऑर्डर ऑफ इंडियन एम्पायर हा किताब देण्यात आला. अनेक देशी आणि परदेशी संस्था तसेच विद्यापीठांनी त्यांना विविध पदव्या देऊन त्यांचा सन्मान केला होता. १९५५ मध्ये ९५ व्या वर्षी त्यांना 'भारतरत्न' हा भारतातील सर्वोच्च सन्मान देऊन गौरविण्यात आले.

व्यक्तिशः विश्वेश्वरैया हे शाकाहारी, निर्व्यसनी असून, त्यांना साधे राहणीमान आवडे. ते सुधारणाचादी विचारांचे होते. पुण्यात ते पांडारकर, गोपालकृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, ३. थोर सुधारकांच्या सहवासात आले होते. प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा आणि समर्पण ही विश्वेश्वरैयांची मुख्य वैशिष्ट्ये होती. दि. १४ एप्रिल १९६२ रोजी बंगळुरू येथे वयाच्या १०२ व्या वर्षी एम. विश्वेश्वरैय्या यांचा मृत्यू झाला. पण तोपर्यंत ते असंख्य दंतकथांचा विषय झाले होते.

दीर्घायुष्याचे रहस्य विचारल्यावर एकदा ते हसत म्हणाले होते की, मृत्यू जेव्हा जेव्हा भेटायला येई, तेव्हा मला वेळ नसल्याने मी त्याला दारच उघडले नाही. एक दंतकथा अशी आहे की, ते एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना, केवळ रुळांच्या आवाजावरून ४०० मीटर अंतरावरचे रूळ तुटले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांचा हा अंदाज खरा ठरला. म्हैसूरचे दिवाणपद स्वीकारण्यापूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांची एक बैठक घेतली होती. आपल्या पदाचा कोणत्याही फौटुंबिक कामासाठी वापर केला जाणार नसेल, तरच आपण है पद स्वीकारू, अशी अट त्यांनी घातली होती. ते दोन पेन वापरत. एक सरकारी कामासाठी आणि एक खासगी कामासाठी. एवढी निःस्पृहता आणि तत्वनिष्ठा आज काल्पनिक वाटेल, पण त्यामुळेच ते राज्यकार्यापासून ते बुद्धिमंतांपर्यंत सर्वोच्या आदरस्थानी होते. त्यांच्चा मृत्यूनंतर मुद्देनहळ्ळी येथे त्यांच्या जन्मगावी त्यांचे स्मारक तसेच संग्रहालय स्थापन करण्यात आले. एखाद्या मंदिराप्रमाणे श्रद्धा आणि निष्ठेने जपले गेलेले हे स्मारक पवित्र व प्रेरणादायी ठिकाण झाले आहे.

१५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस 'अभियंता दिन' (इंजिनिअर्स हे) म्हणून साजरा केला जातो. तीव्र बुद्धिमत्ता व बहुमुखी प्रतिभा, समाजाभिमुखता, प्रचंड कार्य, तत्वनिष्ठा व दीर्घायुष्य या सर्व गोष्टी एकत्रित असण्याचा योग जगात फारच दुर्मीळ आहे. तसा योग असणारे व जिवंतपणीच दंतकथांचा विषय उरलेले विश्वेश्वरैया आपल्या देशात जन्मले, एवढी गोष्टदेखील केवळ इंजिनिअर्स नव्हे, तर प्रत्येक भारतीयास अभिमान वाटण्यास पुरेशी आहे.
- लेखन- इंजि. हरिभाऊ गिते, अध्यक्ष, सरळ सेवा वर्ग १ अभियांत्रिकी अधिकारी संघटना, महाराष्ट्र

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news