ED Raid Nashik Ashok Kharat | भोंदू अशोक खरातच्या 'ओकस प्रॉपर्टी'वर ईडीचा छापा; साडेतीन तास चालली झाडाझडती

ED Raid Nashik Ashok Kharat | तब्बल साडेतीन तास झाडाझडती, बॅगा भरून दस्तावेज जप्त
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरातच्या काळ्या साम्राज्यावर सक्तवसुली संचालनालयाने आपला फास अधिक आवळला आहे. कॅनडा कॉर्नर परिसरातील खरातच्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयावर शुक्रवारी (दि. १७) ईडीने छापा टाकला. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या मॅरेथॉन झाडाझडतीनंतर पथकाने कार्यालयातून महत्त्वपूर्ण दस्तावेज आणि बंद पाकिटांतील पुरावे बॅगा भरून जप्त केले आहे.

Ashok Kharat Case
TCS Nashik Case: TCS नाशिक प्रकरणात मोठा ट्विस्ट; कंपनीचं धक्कादायक स्पष्टीकरण, आमच्याकडे...

डीलर्स अॅण्ड डेव्हलपर या दुपारी १२ च्या सुमारास ईडीचे पथक अचानक कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात धडकले. यावेळी स्थानिक एसआयटीचे अधिकारीही सोबत होते. कार्यालयाचे दरवाजे आतून बंद करीत प्रत्येक फाइल आणि संगणकीय डेटाची बारकाईने तपासणी करण्यात आली.

खरातने फसवणुकीतून कमावलेली मालमत्ता आणि त्याचे आर्थिक धागेदोरे कोणापर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास या कारवाईत करण्यात आल्याचे समजते. कारवाई पूर्ण झाल्यानंतर पथकाने सर्व जप्त केलेले साहित्य सीलबंद करत सोबत नेले. तपास पूर्ण होताच ओकस कार्यालयाला पुन्हा एकदा प्रशासनाकडून अधिकृत सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे शहरातील बड्या संशयितांचे आणि खरातच्या निकटवर्तीयांचे धाबे दणाणले आहेत.

ईडीच्या रडारवर मालमत्ता

भोंदू अशोक खरातने सर्वसामान्यांची फसवणूक करत जमवलेली मालमत्ता आता ईडीच्या कचाट्यात आली आहे. आजच्या कारवाईनंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे खरातच्या बेनामी संपत्तीचे अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

ओकस प्रॉपर्टीजच्या माध्यमातून नाशिकसह जिल्ह्यात कुठे कुठे जमिनी खरेदी केल्या, याचा शोध आता ईडी घेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळाल्यास खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांची बँक खाती तसेच मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते.

Ashok Kharat Case
Nida Khan case |निदा खानची हकालपट्टी; ‘टीसीएस’चे पत्र जारी

पथकात पाच वरिष्ठ अधिकारी

ईडीच्या पथकात पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यात एसआयटी पथकातील अधिकारीही होता. अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे शटर बंद करत आतमध्ये दस्तावेजाची पडताळणी केली. याशिवाय संगणकीय डेटाही तपासला.

सूत्रानुसार, पथकाला बरीच माहिती प्राप्त झाली असून, खरातच्या बेनामी संपत्तीचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांपासून ईडी आणि आयकर विभागाकडून खरातच्या नाशिक आणि पुण्यातील घरांची झाडाझडती घेतली. आता कार्यालयावर धाड टाकल्याने, यात आणखी काही लोकांची नावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news