TCS Nashik | नाशिक टीसीएस प्रकरणाची चौकशी आता 'एक्स्पर्ट'च्या हाती! पारदर्शक तपासासाठी स्वतंत्र संस्थांची नियुक्ती

TCS Nashik | स्वतंत्र सल्लागार म्हणून डेलॉईट-ट्रायलीगलची नियुक्ती
TCS Nashik Case
TCS Nashik CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

येथील कॉर्पोरेट जिहादप्रकरणी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने अंतर्गत चौकशीची प्रक्रिया गतिमान करत स्वतंत्र तज्ज्ञ संस्थांची मदत घेतली आहे. पारदर्शक तपास आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत कटिबद्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

TCS Nashik Case
TCS Nashik Operations Update | नाशिक टीसीएस प्रकरणात कंपनीचा मोठा निर्णय! सर्व संशयित निलंबित, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम'चे आदेश

नाशिक युनिटशी संबंधित प्रकरणात टीसीएसने महत्त्वाची पावले उचलत आणि यांची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. ही चौकशी कंपनीच्या अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकारी आरती सुब्रमणियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, त्यावर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ओवरसाईट कमिटी स्थापन करण्यात आली आहे.

अंतर्गत चौकशीचे निष्कर्ष या समितीसमोर सादर करण्यात येणार असून त्यानुसार आवश्यक शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान, प्रसारमाध्यमांमध्ये एचआर मॅनेजर म्हणून उल्लेख होत असलेल्या निदा खान या केवळ प्रोसेस असोसिएट असल्याचे टीसीएसने स्पष्ट केले आहे.

TCS Nashik Case
Nashik Municipal Corporation |नाशिकमध्ये सिंहस्थापूर्वी हॉकर्स झोनचे फेरनियोजन! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापौरांचा मोठा निर्णय

तसेच नाशिकमधील युनिट नियमितपणे सुरू असून ते बंद झाल्याच्या वातम्या चुकीच्या असल्याचेही नमूद करण्यात आले. प्राथमिक तपासात कंपनीच्या एथिक्स किंवा पॉश यंत्रणेकडे अशा प्रकारच्या तक्रारी आढळल्या नसल्याचा दावा करण्यात आला आहे. कर्मचारी सुरक्षितता, सन्मान आणि शून्य सहनशीलतेच्या धोरणाबाबत कंपनीने आपली कटिबद्धता पुन्हा अधोरेखित केली असून तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य केले जात असल्याचेही सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news