Nashik Conversion Case: नाशिक 'TCS' धर्मांतर प्रकरणातील धक्कादायक Video समोर; हिंदू तरुणाला बीफ खाण्यासाठी, नमाज पठणासाठी भाग पाडले?

Nashik Conversion Case
Nashik Conversion Casepudhari
Published on
Updated on

Nashik Conversion Case: नाशिकमधील टीसीएस (TCS) कंपनीशी संबंधित धर्मांतर प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक, तौसीफ अत्तार आणि एका पीडित हिंदू तरुणाचा धर्मांतर प्रक्रियेशी संबंधित असल्याचा दावा केला जाणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांसमोर आता या प्रकरणाचे संपूर्ण सत्य बाहेर काढण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

Nashik Conversion Case
Amravati Video Case : परतवाडा 'व्हिडिओ' प्रकरणात अयान अहमदसह ४ जण गजाआड; ८ अल्पवयीन मुलींचे १८ व्हिडिओ-३९ फोटो व्हायरल

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडिओमध्ये एक हिंदू तरुण केशरी रंगाचा कुर्ता परिधान केलेला दिसत आहे. संबंधित तरुणाने आरोप केला आहे की, आरोपी तौसीफ अत्तार याने त्याच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला होता. त्याला केवळ नमाज पठण करण्यासाठीच नव्हे, तर 'रोजा' ठेवण्यासाठी आणि 'बीफ' (गोमांस) खाण्यासाठी देखील भाग पाडण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह बोलण्यासही प्रवृत्त केल्याचा गंभीर दावा या पीडित तरुणाने केला आहे.

Nashik Conversion Case
Nashik IT Company Conversion Case | नाशिकच्या IT कंपनीत धर्मांतराचा 'मास्टर प्लॅन'! व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपद्वारे तरुणींचे ब्रेनवॉश

व्हिडिओमुळे प्रकरणाला गती

काही दिवसांपूर्वी पीडित तरुण आणि आरोपी तौसीफ यांचे काही फोटो समोर आले होते. मात्र, आता थेट व्हिडिओ समोर आल्याने हा 'लॅण्ड जिहाद' किंवा संघटित धर्मांतराचा प्रकार असल्याच्या संशयाला बळ मिळाले आहे. व्हिडिओमध्ये धर्मांतराची प्रक्रिया कशा प्रकारे पार पाडली जात होती, याचे चित्रण असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी तौसीफ अत्तार सध्या पोलीस कोठडीत असून, पोलीस या व्हिडिओची तांत्रिक तपासणी करत आहेत.

Nashik Conversion Case
Nida Khan Pregnant: मी गरोदर आहे... TCS धर्मांतरण प्रकरणातील 'फरार' आरोपी HR निदा खानची जामीनासाठी कोर्टात धाव

तपास यंत्रणांसमोर आव्हान

नाशिक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, कंपनीतील इतर कर्मचारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यात सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणातील दुसरी मुख्य संशयित निदा खान सध्या फरार असून, तिने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या व्हिडिओतील पुराव्यांमुळे आता पोलिसांना तौसीफची अधिक सखोल चौकशी करता येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news