Dhule Shirpur Highway accident: धुळे-शिरपूर महामार्गावर एसटीने दुचाकीला चिरडले, ७ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू; आई-वडील जखमी

धुळे -शिरपुर महामार्गावर वर्षी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सात वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
accident
accidentfile photo
Published on
Updated on

Dhule Shirpur Highway accident

सोनगीर : धुळे -शिरपुर महामार्गावर वर्षी गावाजवळ भीषण अपघात घडला. या अपघातात सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सुनील रतीलाल पावरा असे मृत बालकाचे नाव असून तो आपल्या आई वडिलांसह मोटरसायकल वरून मध्यप्रदेश कडे जात होता.

accident
Samruddhi Expressway Accident | समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; आई-वडील गंभीर, दीड वर्षांचे बाळ चमत्कारिकरित्या बचावले

महामार्गावर एसटी बसने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात सुनील गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. अपघातात त्याचे आई-वडीलही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर एसटी बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढली या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून फरार एसटी चालकाचा शोध घेतला जात आहे.

accident
Palghar Accident | मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news