Mopa Airport Taxi Driver | मोपा विमानतळावरील प्रवासी मिळवण्याच्या वादातून टॅक्सीचालकाला मारहाण; आठ जणांविरुद्ध पेर्ने पोलिसांत गुन्हा दाखल

Mopa Airport Taxi Driver | मोपा विमानतळावर प्रवासी मिळवण्याच्या मुद्द्यावरून नागझर येथे एका टॅक्सीचालकाला अडवून मारहाण केल्याची तक्रार पेर्ने पोलिसांत दाखल झाली आहे.
Mopa Airport Taxi Driver
Mopa Airport Taxi Driver
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

मोपा विमानतळावर प्रवासी मिळवण्याच्या मुद्द्यावरून नागझर येथे एका टॅक्सीचालकाला अडवून मारहाण केल्याची तक्रार पेर्ने पोलिसांत दाखल झाली आहे. या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० ते ५.४५ या वेळेत नागझर येथील विनीत हॉटेलजवळील टी-जंक्शनवर घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

Mopa Airport Taxi Driver
Pernem Crime News | पेडणे तालुक्यात खळबळ; शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची टोकाची भूमिका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देऊळवाडा, उगवे-पेर्ने येथील रहिवासी आणि टॅक्सीचालक निखिल ज्ञानेश्वर महाले (३५) यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे १४ ऑक्टोबर रोजी रात्री ११.५१ वाजता पेर्ने पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्यांमध्ये दिनेश खडपे व सिद्धेश खडपे (दोग्रही रा. मोपा), बाबू भुजबळ (रा. इब्रामपूर), रूपेंद्र परब (रा. वजरी), मनोज आरोस्कर (रा. नानाचेपाणी, वारखंड), संजय मलिक (रा. हसापूर), क्रिश ठाकूर व विष्णु शिरोडकर (दोग्रही रा. दादाचीवाडी, धारगल-पेर्ने) यांचा समावेश आहे.

Mopa Airport Taxi Driver
Russian Woman Illegal Stay | पेडणे तालुक्यातील कोरगावमध्ये रशियन महिलेचे बेकायदेशीर वास्तव्य; पोलिसांकडून कारवाई

तक्रारदार महाले यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित आठ जणांनी समान उद्देशाने बेकायदेशीर जमाव करून त्यांना आणि त्यांचे मित्र नंदकुमार मावळकर व रामा वारंग यांना अडवले. त्यानंतर महाले यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेत महाले यांना किरकोळ दुखापती झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय, संबंधितांनी धमकीही दिल्याची आरोप महाले यांनी तक्रारीत केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news