Pernem Crime News | पेडणे तालुक्यात खळबळ; शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची टोकाची भूमिका

Pernem Crime News | पतीची पोलिसांत तक्रार : चुकीच्या माहितीमुळे मानसिक त्रास दिल्याचा आरोप
Pernem Crime News
Pernem Crime NewsPudhari
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे तालुक्यातील एका ४३ वर्षीय व्यक्तीने शेजाऱ्याच्या कथित त्रासामुळे पत्नीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. शेजाऱ्याने वारंवार खोटे दावे करून पत्नीला मानसिक त्रास दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Pernem Crime News
Russian Woman Illegal Stay | पेडणे तालुक्यातील कोरगावमध्ये रशियन महिलेचे बेकायदेशीर वास्तव्य; पोलिसांकडून कारवाई

तक्रारीनुसार, शेजाऱ्याने एप्रिल ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत तक्रारदाराच्या ४२ वर्षीय पत्नीला संदेश पाठवले आणि फोन केले. तक्रारदाराचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचे त्याने खोटे सांगितल्याचा आरोप आहे. चुकीच्या माहितीमुळे पत्नीला मानसिक त्रास झाला. यातून तिने आत्महत्या केल्याचे नमूद करण्यात आले आहे.


मराठी राजभाषा निर्धार समितीचा उद्या वाळपईत मेळावा:

वाळपई : मराठी राजभाषा निर्धार समितीतर्फे १३ रोजी वाळपईत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ वेळेत काणकोणकर सभागृहात मेळावा होणार आहे. यात मराठीप्रेमींनी उपस्थित राहावे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news