Russian Woman Illegal Stay | पेडणे तालुक्यातील कोरगावमध्ये रशियन महिलेचे बेकायदेशीर वास्तव्य; पोलिसांकडून कारवाई

Russian Woman Illegal Stay | कोरगावच्या भटवाडीत आढळली ३३ वर्षीय महिला
Goa Police
Goa PoliceFile Photo
Published on: 
Updated on: 

पेडणे : पुढारी वृत्तसेवा

पेडणे तालुक्यातील कोरगाव येथील भटवाडी परिसरात वैध पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपावरून ३३ वर्षीय रशियन महिलेविरुद्ध पेडणे पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी पेडणे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आदित्य मुकुंद गाड यांनी राज्य सरकारतर्फे तक्रार नोंदवली आहे.

Goa Police
Goa politics : मांद्रे, पेडणे मतदारसंघांत महिला संधीच्या प्रतीक्षेत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तैसिया सोकोलोवा (वय ३३) रशियन नागरिक असे संबंधित महिलेचे नाव आहे. ती कोरगाव येथील भटवाडी परिसरातील एका घरात वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळून आले.
ही कारवाई शनिवार, दि. ३ रोजी सकाळी सुमारे ९.१५ वाजता करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिला भारतात वास्तव्य करत असताना तिच्याकडे वैध पासपोर्ट, तसेच वैध व्हिसा नसल्याचे आढळून आले.

Goa Police
Omkar Elephant | पेडणे तालुक्यात 'ओंकार' हत्तीची दहशत! मोप आणि तोरसेच्या सरपंचांची वन अधिकाऱ्यांकडे धाव

त्यामुळे तिच्याविरुद्ध इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ॲक्ट २०२५ अंतर्गत कलम ३(१), २३ए सह कलम २१ अंतर्गत प्रकरण नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
परदेशी नागरिकांनी भारतात वास्तव्य करताना पासपोर्ट, व्हिसा तसेच लागू असलेल्या स्थलांतरविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर पेडणे पोलिसांकडून संबंधित प्रकरणाची अधिक चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पेडणे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आदित्य गाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news