Sahakar Sankul | नाशिकमध्ये 66 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चातून साकारणार अत्याधुनिक 'सहकार संकुल'

Sahakar Sankul | सहा कार्यालये एकाच छताखाली, मुख्य सचिव समितीकडून अंतिम मंजुरी
Sahakar Sankul
Sahakar SankulFile Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील द्वारका व सारडा सर्कल परिसरातील सुमारे ६० वर्षे जुनी आणि जीर्ण झालेली जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाची इमारत लवकरच इतिहासजमा होणार आहे. सहकार क्षेत्राचे बळकटीकरण आणि प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्यासाठी या मोक्याच्या जागेवर सर्व सोयीसुविधांनी युक्त १० मजली भव्य आणि अत्याधुनिक 'सहकार संकुल' उभारण्यात येणार आहे.

Sahakar Sankul
President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

आ. देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चधिकार समितीने या ६६ कोटी ६१ लाख रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अंतिम मान्यता दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष बांधकामाला गती दिली जाणार आहे.

सध्या नाशिक शहरात विविध ठिकाणी भाड्याच्या इमारतीमध्ये सहकार विभागाची ६ प्रमुख कार्यालये विखुरलेली आहेत. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची एका कामासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पायपीट होत आहे.

हे नवीन संकुल उभे राहिल्यानंतर ही सर्व सहाही कार्यालये एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे प्रशासकीय समन्वय वाढून, दरमहा शासकीय भाड्यापोटी खर्च होणारे सुमारे १ लाख ८० हजार रुपयांहून अधिक निधीची कायमस्वरूपी बचत होणार आहे. सारडा सर्कल परिसर येथील विद्यमान इमारत सुमारे ६० वर्षे असल्याने अत्यंत जीर्ण झाली होती. पावसाळ्यात पाण्याची गळती आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे तिथे येणारे नागरिक तसेच कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.

ही समस्या ओळखून आ. फरांदे यांनी शासन दरबारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे उच्चधिकार समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्य सचिव समितीच्या मंजुरीनंतर आता प्रशासकीय पातळीवर हालचालींना वेग आला असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाचे भूमिपूजन केले जाणार आहे.

Sahakar Sankul
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

असे असेल सहकार संकुल:

  1. भव्य रचना: तळघर (बेसमेट), स्टिल्ट फ्लोअर आणि १० मजले अशी एकूण ८,०८०.९० चौरस मीटर क्षेत्रफळाची सुसज्ज व सुरक्षित इमारत.

  2. आधुनिक व्यवस्था: ५ वेगवान लिफ्ट्स, प्रशस्त वाहन पार्किंग, महिला व दिव्यांगासाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, हिरकणी कक्ष, बैठक सभागृह, निवडणूक कक्ष आणि आयत्यासाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष.

  3. पर्यावरणपूरक उपक्रम: इमारतीवर रूफटॉप सोलर यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, आधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तसेच सर्वसमावेशक अग्निशामक सुरक्षा यंत्रणा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.