President Droupadi Murmu | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर प्रशासकीय स्तरावर होणार महत्त्वाचे 'डी-ब्रीफिंग'

President Droupadi Murmu | प्रोटोकॉल, सुरक्षाव्यवस्थेसह खर्चाचेही होणार परीक्षण
President Droupadi Murmu
President Droupadi Murmu
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नाशिक-त्र्यंबकेश्वर दौरैनंतर आता प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या यावांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयाच्या 'ब्लू बुक'मध्ये निश्चित केलेल्या सुरक्षा आणि प्रोटोकॉलविषयक मार्गदर्शक तत्त्वांनुसार दौऱ्यानंतर आढावा घेण्याची प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते.

President Droupadi Murmu
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

त्यानुसार नाशिकमध्येही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या समन्वयातून डी-ब्रीफिंग बैठक घेऊन संपूर्ण दौर्याचा आढावा अपेक्षित आहे. या बैठकीत प्रोटोकॉलचे पालन, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि सोहळ्यासाठी झालेल्या खर्चाचा तपशील तपासला जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियोजन बैठका घेत सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलिस प्रशासन, महापालिका, आरोग्य विभाग, विद्युत विभाग आणि प्रोटोकॉल विभाग यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या.

दौरा पार पडल्यानंतर संबंधित यंत्रणांनी केलेल्या कामांचा आढावा घेणे आणि काही त्रुटी आढळल्यास त्यांची नोंद घेणे, हा डी-ब्रीफिंग प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग आहे. या डी-ब्रीफिंग बैठकीत सर्वप्रथम राष्ट्रपतींच्या दौऱ्यात प्रोटोकॉलचे पालन झाले की नाही, याची तपासणी केली जाणार आहे.
राष्ट्रपतींच्या स्वागतासाठी कोणते अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार होते, त्यांची यादी निर्धारित प्रक्रियेनुसार पाठवली होती का, स्वागत, व्यासपीठावरील आसन व्यवस्था आणि कार्यक्रमातील अन्य शिष्टाचारांचे पालन झाले का, तसेच खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.

सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींवरही लक्ष

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सुरक्षाव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य असते. त्यामुळे पोलिस बंदोबस्त, वाहतूक नियोजन, मार्गाची सुरक्षितता, गर्दी नियंत्रण, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या हालचाली यांचा आढावा संबंधित विभागांकडून घेतला जाऊ शकतो. दौऱ्यादरम्यान कोणतीही त्रुटी किंवा अडचण निर्माण झाली का, याचीही नोंद केली जाणार आहे.

President Droupadi Murmu
Nashik ZP to NASA | जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना मिळणार 'नासा' दौर्याची सुवर्णसंधी; 'नाशिक ते नासा' उपक्रमांतर्गत मोठी घोषणा

गर्दी व्यवस्थापन आराखड्याचाही आढावा?

सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी २०१२ च्या कुंभमेळ्यानंतर २०१३ मध्ये आपत्सी व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यात नाशिकमधील रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसरातील गर्दी नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांचा समावेश आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या डी-ब्रीफिंग बैठकीनिमित्त या दोन्ही महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील गर्दी व्यवस्थापनाचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. प्रत्यक्ष कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणात कोणत्या अडचणी आल्या, नियोजनातील त्रुटी कोणत्या होत्या आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, यावरही चर्चा होऊ शकते. आगामी पर्वणीच्या दृष्टीने हा आढावा महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.