Nashik Public Health Department | संदर्भ 'सेवा' तील 14.70 कोटींची उपकरणे भंगारात

Nashik Public Health Department | सीटी स्कॅन, लिनिअर अॅक्सिलरेटर, कार्डियाक कॅथलॅब यंत्रांचा समावेश
Health Department Order Mumbai
Medical Instruments Scam(File Photo)
Published on
Updated on

नाशिक : आसिफ सय्यद

येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयातील १४ कोटी ७० लाख ७२ हजार ८४१ रुपयांची ९० वैद्यकीय उपकरणे कालबाह्य ठरली आहेत. ही यंत्रे निकामी झाल्यामुळे ती भंगारात काढण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. या संदर्भातील शासन निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केला आहे.

Health Department Order Mumbai
Nashik cattle transport: चांदवड पोलिसांची धाडसी कारवाई; चार गोवंशांची सुटका

नाशिक मंडळाच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी रुग्णालयातील ९४ कालबाह्य उपकरणे निर्लेखित करण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाला सादर केला होता. या यादीतील चार डायलेसिस चेअर यांची खरेदी किंमती दोन लाखांहून कमी असल्यामुळे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका १९७८ मधील नियम १४६ नुसार आधीच त्यांच्या विल्हेवाटीस मान्यता देण्यात आली होती.

उर्वरित ९० उपकरणांची किंमत २ लाख रुपयांहून अधिक असल्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रालयात राज्य शासनाकडे प्रलंबित होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. या उपकरणांत प्रामुख्याने कर्करोग, हृदयविकार आणि गंभीर आजारांवर उपचार करणाऱ्या सीटी स्कॅन मशीन, लिनिअर अॅक्सिलरेटर, कार्डियाक कॅथलॅब, व्हेंटिलेटर्स, मॅमोग्राफी मशीन, डायलिसिस मशीन, मॉनिटर्स, एक्स-रे मशीन, डिफिब्रिलेटर यासारख्या महत्त्वाच्या यंत्रसामग्रीचा समावेश आहे.

अनेक उपकरणे गेल्या पाच ते सात वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. काही उपकरणांना उत्पादक कंपनीकडून तांत्रिक साहाय्य बंद झाल्यामुळे ती वापरात ठेवणे अशक्य झाले होते. शासन निर्णयानुसार, या उपकरणांचे आयुष्यमान संपल्यानंतर ती वापरास अयोग्य ठरली आहेत. विशेष म्हणजे, रुग्णालयातील ६ स्लाइस सीटी स्कॅन मशीनची खरेदी किंमत तब्बल १.५१ कोटी रुपये होती.

कर्करोग उपचारासाठी वापरले जाणारे लिनिअर अॅक्सिलरेटर मशीन ४.२४ कोटी रुपयांचे होते. कार्डियाक कॅथलॅब मशीनची किंमत २.६७ कोटी रुपये होती. ही सर्व यंत्रणा आता निकामी झाल्याचे शासनाच्या यादीत नमूद करण्यात आले आहे. आयसीयू व्हेंटिलेटर्स, हार्टलंग मशीन, मल्टीपॅरा मॉनिटर्स, डायलिसिस मशीन, बायोकेमिस्ट्री अॅनालायझर, ४ डी सोनोग्राफी मशीन, ब्लड बँक रेफ्रीजरेटर, डीप फ्रीझर यांसारखी उपकरणेदेखील बंद पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

Health Department Order Mumbai
Nashik Nafed Onion Purchase | शासकीय त्रिसदस्यीय समितीच्या नियंत्रणात बाजार समितीत नाफेडकडून कांदा खरेदी

कोट्यवधींची उपकरणे धूळ खात पडण्याचे कारण

शासकीय नियमानुसार या वैद्यकीय उपकरणांचे आयुष्यमान साधारणपणे १० वर्षे निश्चित करण्यात आले होते. निर्लेखित करण्यात आलेल्या बहुतांश उपकरणांची खरेदी २००७ ते २०१३ या कालावधीत झाली होती. २०१७ ते २०२३ या कालावधीतच सर्व उपकरणांचे १० वर्षांचे आयुष्यमान संपले होते. त्याच वेळी संबंधित उत्पादक कंपन्यांनी या उपकरणांचे सुटे भाग आणि देखभाल दुरुस्ती करण्यास नकार दिला होता. कंपन्यांचा सपोर्ट संपल्यामुळे आणि दुरुस्ती खर्च अवाढव्य असल्यामुळे ही उपकरणे रुग्णालयात बंद अवस्थेत पडून होती.

देखभाल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे निकामी झाली. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील देखभाल, देखरेख आणि वेळेवर बदल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयात नव्या यंत्रसामग्रीची उभारणी आणि आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news