Palghar Accident | मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; कार चालकाचा जागीच मृत्यू

पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंडीतील उतारावर भीषण अपघात
Mumbai Ahmedabad Highway Crash
Mumbai Ahmedabad Highway CrashPudhari
Published on
Updated on

Mumbai Ahmedabad Highway Accident

Palghar Newsपालघर : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर पालघर तालुक्यातील ढेकाळे गावाच्या हद्दीतील वाघोबा खिंडीतील उतारावर झालेल्या भीषण अपघातात कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी (दि.१५) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास गुजरात मार्गिकेवरील भरधाव वेगातील कारने धावत्या कंटेनरला धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात कार चालक बेंजामिन डिसूजा (वय.47) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, चालकाचा मृतदेह कारमध्येच अडकून पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. क्रेनच्या सहाय्याने अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कारमध्ये अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मनोर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी मनोर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.

Mumbai Ahmedabad Highway Crash
Palghar Crime: बनावट ओळखीने महिलेवर अत्याचार; आरोपीला पुण्यातून अटक

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक प्रभावित झाली होती. अपघातग्रस्त वाहन हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून अपघाताचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news