

Snake Venom Rapid test kit Cost Maharashtra
नाशिक : आसिफ सय्यद
सर्पदंश झालेल्यांचे प्राण आता वाचवता येणार आहे. सर्पदंश विषारी सापाचा आहे किंवा नाही हे आता काही मिनिटांतच ओळखता येणार आहे. यासाठी तब्बल ६.१४ कोटींचे 'स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट' खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सर्व शासकीय रुग्णालयांत हे कीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. राज्यात विशेषतः ग्रामीण भागात सर्पदंशाच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात.
शेतीत काम करताना शेतकऱ्यांना सर्पदंश होण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशावेळी साप विषारी) होता की बिनविषारी हे वेळीच लक्षात न आल्यास सर्पदंश झालेल्यावर उपचार करणे कठीण जाते. त्यामुळे सर्पदंश झालेली व्यक्ती दगावण्याचा धोका अधिक असतो.
सर्पदंश विषारी सापाचा आहे किंवा नाही, हे ओळखण्यासाठी आता सरकारने 'स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट' खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या १८ सप्टेंबरच्या पत्रानुसार या कीटचा समावेश राज्यस्तरीय प्रयोगशाळा साहित्य सूचीत करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यभरातील ३४ जिल्ह्यांमधील शासकीय रुग्णालयांना हे कीट उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तब्बल १ लाख १० हजार २१३ कीटची खरेदी केली जाणार आहे. या कीटमुळे सर्पदंशाच्या प्राथमिक उपचारात अचूक निदान शक्य होणार आहे. अॅन्टीस्नेक व्हेनमचा अनावश्यक वापर टाळता येणार आहे. रुग्णाचा जीव वाचवणे आता सुकर बनणार आहे
नाशिकसाठी २५,५०० कीट
सर्पदंशाचे निदान करण्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या १.१० लाख कीटपैकी २५ हजार ५०० कीट एकट्या नाशिक जिल्ह्यासाठी असणार आहेत. त्या खालोखाल भंडारदऱ्यासाठी १२ हजार ५७५, वाशिमसाठी १२ हजार ४००, नंदुरबार ११ हजार, अमरावती ६ हजार, नांदेड ५५००, परभणी ५३५०, गडचिरोली, गोंदियासाठी प्रत्येकी पाच हजार कीटची खरेदी केली जाणार आहे.
काय आहे 'स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट'
वाचवता येणार आहे. सर्पदंश झाल्यानंतर चावा घेणारा साप विषारी होता की नाही, कोणत्या प्रकारचा साप विषारी आहे याचे अचूक निदान 'स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट कीट'च्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत करता येणार आहे. त्यामुळे सर्पदंश झालेल्यांचे प्राण
राज्यात सर्पदंशामुळे दरवर्षी ४ हजार मृत्यू
भारतात सर्पदंशाने दरवर्षी सुमारे ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. जागतिक स्तरावर सर्पदंश मृत्यूंमध्ये भारतात ही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रात दरवर्षी ४ हजार लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. या मृत्यूंमध्ये ग्रामीण, शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचा मोठा वाटा आहे. पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटना वाढतात. योग्य वैद्यकीय सुविधा वेळेवर न मिळाल्याने परिस्थिती गंभीर होते
कीटमुळे असे होते निदान
साप या कीटमुळे सर्पदंश विषारी आहे, की बिनविषारी याचे अचूक निदान होते. रुग्णाच्या रक्तातील किंवा जखमी स्थळी उपस्थित विषाचे कण शोधण्याची क्षमता या कीटमध्ये आहे. सर्पदंश झालेल्या रुग्णाच्या रक्ताचा नमुना कीटमध्ये टाकल्यानंतर ५ ते १० मिनिटांत सर्प विषारी आहे की, नाही याची माहिती मिळते.