Double Death Case | नाशिकमध्ये एकाच घरात दीर-भावजयीचे मृतदेह आढळले; सिन्नर तालुक्यात खळबळ

Double Death Case | तालुक्यातील सायाळे येथे दीर आणि भावजयीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली.
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील सायाळे येथे दीर आणि भावजयीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. २८) सकाळी उघडकीस आली. सुनील थोरात (२६) आणि वैष्णवी थोरात (२५) अशी मृतांची नावे आहेत.

Death
Dengue Outbreak | सिन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक तीव्र; एका महिन्यात 11 नवीन रुग्णांची नोंद

एकाच घरात दोघेही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना प्रेमप्रकरणातून घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

थोरात यांच्या राहत्या घरापासून शंभर फुटांवरील शेतगट क्रमांक ७४४ मधील स्टोअर रूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले. शुक्रवारी (दि. २७) रात्री साडेअकरा ते शनिवारी (दि. २८) सकाळी साडेआठच्या दरम्यान ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Death
Manikrao Kokate | सिन्नर शहरात पावणेदोन कोटी लिटरपैकी 35 लाख लिटर पाणी जाते कुठे? आमदार माणिकराव कोकाटे यांचा संतप्त सवाल

शनिवारी सकाळी दोघेही घरातील लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यानंतर गावकामगार पोलिसपाटील सोमनाथ शिंदे यांनी वावी पोलिसांना घटनेची माहिती दिली. वैष्णवी थोरात यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.