Dengue Outbreak | सिन्नर तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचा उद्रेक तीव्र; एका महिन्यात 11 नवीन रुग्णांची नोंद

Dengue Outbreak | महिन्यात 11 रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण व फवारणी
Dengue Outbreak
Dengue Outbreakpudhari photo
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत ऑक्टोबर महिन्यात वाढ झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तालुक्यात आतापर्यंत डेंग्यूचे २० रुग्ण आढळले असून, त्यापैकी ११ रुग्णांची नोंद ऑक्टोबर महिन्यात झाली आहे. लोणारवाडी येथे भागवत सदाजी लोणारे यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आरोग्य विभागाने गावात घरोघरी सर्वेक्षण, पाणी साठवणुकीच्या भांड्यांची तपासणी तसेच जंतुनाशक औषधांची फवारणी व धुरळणी केली आहे.

Dengue Outbreak
Sinnar Ration Card eKYC | सिन्नर तालुक्यात ई-केवायसीअभावी 23 हजार 501 लाभार्थ्यांचे रेशन आले धोक्यात

लोणारवाडी येथे डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण केले. घरातील पाणी साठवून ठेवलेल्या भांड्यांची तपासणी करण्यात आली.

तसेच परिसरात जंतुनाशक औषधांची फवारणी आणि धुरळणी करण्यात आली. लोणारवाडी येथे पंचायत समितीचे विकास अधिकारी अशोक भवारी यांनी भेट देऊन आरोग्य विभागाला सर्वेक्षणाबाबत आवश्यक सूचना केल्या. आरोग्य विभागाने खबरदारीच्या दृष्टीने योग्य कार्यवाही केली असल्याचे त्यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय डेंग्यू रुग्ण

प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय ऑक्टोबरमधील डेंग्यू रुग्ण : ठाणगाव-४, नायगाव-३, पांगरी-२, दापूर-१, वावी-१, सिन्नर-१. तालुक्यात आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण २० रुग्णांमध्ये दापूर केंद्रांतर्गत ३, ठाणगाव केंद्रांतर्गत ४, नायगाव केंद्रांतर्गत ३, पांगर्ली केंद्रांतर्गत २, वावी केंद्रांतर्गत १ आणि सिन्नर केंद्रांतर्गत ४ रुग्णांचा समावेश आहे. उर्वरित ३ रुग्ण इतर केंद्रांच्या नोंदीशी संबंधित असल्याचे उपलब्ध तपशिलावरून दिसते. मात्र, केंद्रनिहाय एकूण संख्येचे मूळ अहवालाशी पडताळणी आवश्यक आहे.

Dengue Outbreak
Manikrao Kokate | सिन्नर शहरात पावणेदोन कोटी लिटरपैकी 35 लाख लिटर पाणी जाते कुठे? आमदार माणिकराव कोकाटे यांचा संतप्त सवाल

नायगाव केंद्रांतर्गत माळेगाव एमआयडीसीतही रुग्ण

नायगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील माळेगाव एमआयडीसी परिसरही डेंग्यूसदृश दोन रुग्ण आढळल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित ग्रामपंचायतीला धुरळणी आणि जंतुनाशक औषधांची फवारणी करण्याबाबत आरोग्य विभागाने पत्र दिले आहे. सहा ते सात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून परिसरात सर्वेक्षण केले जात आहे.

डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी घरातील पाणी साठवण्याच्या टाक्या, हौद आणि इतर भांडी झाकून ठेवावीत. त्यात पाणी अनेक दिवस साठून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. घराच्या परिसरात, कुंड्या, टायर, डबे किंवा इतर वस्तूमध्ये पाणी सासू देऊ नये. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे स्वच्छ करावीत. ताप किंवा डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.

— डॉ. मोहन बच्छाव, तालुका वैद्यकीय अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.