Sinnar Municipal Council Budget | सिन्नरचा विकासाभिमुख अर्थसंकल्प! 242 कोटींच्या शिलकी बजेटमध्ये भुयारी गटार आणि सुरक्षेवर भर

Sinnar Municipal Council Budget | भुयारी गटार, सीसीटीव्ही योजनेसह विकासकामांना प्राधान्य
Sinnar Municipal Council
Sinnar Municipal Council Pudhari News Network
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

नगर परिषदेची सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी २८ लाख रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी (दि. ३१) झालेल्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि सामाजिक योजनांवर भरीव तरतूद करण्यात आली आहे.

Sinnar Municipal Council
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपाचे 3469 कोटींचे बजेट मंजूर! वृक्षप्राधिकरणाला 25 कोटी; सिंहस्थ कामांची 'छाप' कायम

नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. व्यासपीठावर उपनगराध्यक्ष हर्षद देशमुख, मुख्याधिकारी अभिजित कदम, वित्त विभागाचे सचिन पगार उपस्थित होते.

अर्थसंकल्पात महसुली उत्पन्न वाढविण्यावर भर देत मालमत्ता करातून २० कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच विद्युत खर्च पाच कोटींवरून दोन कोटींवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. शहर विकासासाठी खुल्या जागांचा विकास (२ कोटी), पर्यटन व तीर्थक्षेत्र विकास (३.१० कोटी), रस्ते कामांसाठी ९ कोटी आणि कला क्रीडा विभागासाठी ८१ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Sinnar Municipal Council
Ashok Kharat Case | अजित पवार यांच्या फोटोवर खरातने मारल्या फुल्या !

ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रासाठी १.५ कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे. शहरातील सांडपाणी व्यवस्थेसाठी भुयारी गटार योजनेस सुमारे २५ कोटींची तरतूद करण्यात आली असून, ही योजना पूर्ण झाल्यास शहरातील स्वच्छतेचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था बळकट करण्यासाठी शहरात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

अल्पसंख्याकबहुल क्षेत्राच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी देण्यात आला असून, सुः जयंती नगर उद्यानासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय अंत्यविधी अर्थसज्ञहाय्यासाठी १० लाखांची नवीन योजना सुरू करण्यात आली असून, दिव्यांग, महिला, बालविकास व इतर मागासवर्गीयांसाठी प्रत्येकी २० लाखांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिन्नर शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन विकासाभिमुख, संतुलित व लोकाभिमुख असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

- विठ्ठल राजे उगले, नगराध्यक्ष

अर्थसंकल्पात अनावश्यक खर्चाला पायबंद घालून भयारी गटार योजना, भूमिगत वीजवाहिनी अशा कामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

- अभिजित कदम, मुख्याधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news