Ashok Kharat Case | अजित पवार यांच्या फोटोवर खरातने मारल्या फुल्या !

Ashok Kharat Case | विमान अपघातावर संशय; रोहीत पवार यांचा आरोप
Rohit Pawar
आमदार रोहित पवारFile Photo
Published on
Updated on

मुंबई/नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरातशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. भोंदू अशोक खरातकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजित पवारांसह महाराष्ट्रातील एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याने कुणाच्या सांगण्यावरून या फोटोंवर फुल्या मारण्याचा जादूटोणा केला? असा सवाल रोहित पवार यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.

Rohit Pawar
Nashik Political Crisis | भोंदू खरात प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक

रोहित पवार यासंबंधी आपल्या एका पोस्टमध्ये म्हणाले, जादूटोणासारख्या अंधश्रद्धांना महाराष्ट्र कधीही भीक घालत नाही; परंतु जाट्टोणा करणाऱ्या कलुषित मनोवृत्तींचा हेतू दुर्लक्षून चालणार नाही.

भोंदू अशोक खरात याच्याकडे फोटोवर फुल्या मारण्याची पद्धत होती. त्यानुसार अजितदादा यांच्यासह महाराष्ट्रातल्या एका अत्यंत बड्या नेत्याच्या फोटोवर फुल्या मारण्यात आल्याचे समजते. या भोंदू खरातने कुणाच्या सांगण्यावरून फोटोवर फुल्या मारण्याचा जाट्टोणा केला? ज्यांच्या सांगण्यावरून जादूटोणा केला त्यांचा हेतू काय होता? हेही समोर येणे गरजेचे आहे.

खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव

मंगळवारी सकाळी रोहित पवार यांनी अशोक खरातला तुरुंगातच संपवण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, खूप काही जणांची खूप काही माहिती असलेल्या भोंद खरातचे धागेदोरे मोठमोठ्या नेत्यांपर्यंत येऊन पोहचल्याने आत्महत्या किंवा इतर काही दाखवून खरातला संपवायचे तर दुसरीकडे अजितदादांच्या अपघाताची इत्यंभूत माहिती असलेल्या व्ही. के. सिंगला काहीही झाले तरी वाचवायचे अशा चर्चा आहेत.

Rohit Pawar
Nashik Unseasonal Rain | कांदा अन् डाळिंब मातीमोल! 22 हजार हेक्टरवरील पिकांचा चिखल; बळीराजा पुन्हा एकदा हवालदिल

शिर्डीत खरातसह पत्नीविरोधात फसवणूक, सावकारीचा गुन्हा

भोंदू अशोक खरातने शिर्डीत ४ एकर जमीन अवघ्या पाच कोटी रुपयांना खरेदी करून १० कोटींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जमीन विक्रीत फसवणूक आणि सावकारी केल्याने शिर्डीत अशोक खरातसह त्याची पत्नी कल्पना आणि शिर्डीतील मध्यस्थी तिघे असे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डीतील जमीन मालक रावसाहेब नानासाहेब गोंदकर यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचीही चौकशी

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासात एसआयटीकडून धक्कादायक बाबी समोर येत असून, महिलांना गर्भधारणा होऊ नये, यासाठी गर्भनिरोधक औषधांचा वापर केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील दोन नामांकित डॉक्टरांची तपास यंत्रणेकडून चौकशी झाल्याची महिती समोर आली आहे. त्यापैकी एक डॉक्टर एका मोठ्या राजकीय नेत्याचा जावई असल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर सोनोग्राफी सेंटरर्स आणि गर्भनिरोधक गोळ्यांचा पुरवठा करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सच्या मालकांचीही चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news