Sinnar Beedi Workers | सिन्नरमधील हजारो विडी कामगारांना दिलासा; कामबंदचे संकट तूर्तास टळले

Sinnar Beedi Workers | शासनाच्या आदेशानुसार हजार विड्यांमागे 380 रुपये मजुरी देण्याचा मुद्दा ऐरणीवर
Sinnar Beedi Workers
Sinnar Beedi Workers
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर शहराची ओळख असलेल्या विडी उद्योगातील हजारो कामगारांवर निर्माण झालेले कामबंदचे संकट तूर्तास टळले आहे. काही दिवसांपूर्वी कामगारांना विडी तयार करण्यासाठी देण्यात आलेला तंबाखू, पाने व अन्य साहित्य परत घेण्यात आल्याने काम बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

Sinnar Beedi Workers
STICE Sinnar Electricity Issue | सिन्नर औद्योगिक वसाहतीतील वीज समस्यांवर महावितरणचा पॉवर प्लॅन; 10 एमव्हीए ट्रान्सफॉर्मर होणार अपग्रेड

मात्र, विडी कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांशी चर्चा केल्यानंतर कारखानदारांनी पुढील दहा दिवसांसाठी कामगारांना विडी बांधण्यासाठी आवश्यक साहित्य दिले आहे. त्यामुळे कामगारांना तूर्तास दिलासा मिळाला असून, पुढील निर्णयाकडे लक्ष लागले आहे.


याबाबत सिन्नर तालुका विडी कामगार संघाच्या जनरल सेक्रेटरी रेणुका वंजारी यांनी सांगितले की, संघटनेच्या वतीने विडी कारखानदारांशी चर्चा करण्यात आली आहे. कामगार मंत्री, कारखानदार आणि विडी कामगारांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेऊन मजुरीच्या प्रश्नावर चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे.

Sinnar Beedi Workers
Sinnar MIDC power cuts-सिन्नर एमआयडीसीत वारंवार वीज खंडितमुळे उद्योग संकटात

बैठकीत जो निर्णय होईल, तो मान्य करण्यात येईल. सध्या विडी कामगारांना प्रतिहजार विड्यांमागे २४६ रुपये मजुरी मिळत आहे. शासनाने यापुढे प्रतिहजार विड्यांमागे ३८० रुपये मजुरी देण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा कामगार आणि कारखानदारांच्या संयुक्त बैठकीत प्रमुख राहणार आहे.

हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह विडी व्यवसायावर

सिन्नर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कुटुंबे विडी उद्योगाशी जोडलेली आहेत. घरगुती पद्धतीने विड्या तयार करून मिळणाऱ्या मजुरीवर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे कामबंदचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम हजारो कामगारांच्या कुटुंबांच्या उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे.

दहा दिवसांनंतर काय; कामगारांमध्ये उत्सुकता

कामबंदची शक्यता निर्माण झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखानदारांशी तातडीने चर्चा केली. त्यानंतर कारखानदारांनी पुढील दहा दिवसांसाठी तंबाखू, पाने आणि विडी तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य कामगारांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या कालावधीत काम सुरू राहणार असले तरी त्यानंतर काय निर्णय होतो, याबाबत कामगारांपुढे प्रश्न उपस्थित होत आहे.

"कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न लक्षात घेऊन संघटनेने कारखानदारांशी चर्चा केली आहे. सध्या पुढील दहा दिवसांचे काम मिळाले आहे. कामगारांना सध्या मिळणारी २४६ रुपये प्रतिहजार विड्या मजुरी आणि शासनाने आदेशित केलेली ३८० रुपये मजुरी याबाबत संयुक्त बैठकीत चर्चा होणार आहे. कामगारांच्या हिताचा आणि शासनाच्या आदेशानुसार योग्य निर्णय व्हावा, ही संघटनेची भूमिका आहे."

- रेणुका वंजारी, जनरल सेक्रेटरी, सिन्नर तालुका विडी कामगार संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news