Sinnar MIDC power cuts-सिन्नर एमआयडीसीत वारंवार वीज खंडितमुळे उद्योग संकटात

ट्रिपिंगमुळे उत्पादन ठप्प, उद्योजकांचा आंदोलनाचा इशारा
power cuts-
power cuts-
Published on
Updated on

सिन्नर : सिन्नर एमआयडीसी परिसरातील महावितरणच्या अनियमित व अपुऱ्या वीजपुरवठ्यामुळे उद्योजक गंभीर अडचणीत सापडले आहेत. मागील दोन ते तीन महिन्यांपासून दिवसातून चार ते पाच वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. या सततच्या ट्रिपिंगमुळे औद्योगिक क्षेत्रात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वारंवार होणाऱ्या वीज खंडितीमुळे उत्पादन प्रक्रिया विस्कळीत होत असून, उद्योगांना दररोज लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. अनेक उद्योगांमध्ये यंत्रणा अचानक बंद पडल्याने कच्चा माल, तयार माल तसेच यंत्रसामग्रीचे नुकसान होऊन मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे महावितरण प्रशासनाकडून गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप उद्योजकांनी केला आहे.

महावितरणने मोठ्या गाजावाजात उपलब्ध करून दिलेला १० एमव्हीए क्षमतेचा नवीन ट्रान्स्फॉर्मर आवश्यक तांत्रिक चाचण्या न करताच बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच्या कॉइलमध्ये दोष आढळल्याने तो कार्यान्वित होण्यापूर्वीच परत पाठवावा लागला. या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

सध्या एमआयडीसीतील बहुतांश ट्रान्स्फॉर्मर क्षमतेपेक्षा अधिक भारावर कार्यरत असल्याने ट्रिपिंगच्या घटनांत वाढ झाली आहे. परिणामी, नवीन उद्योगांना तसेच विस्तार करणाऱ्या कंपन्यांना आवश्यक वीजभार मंजूर होत नसल्याने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अडकली असून, अनेक उद्योग उत्पादन सुरू करू शकत नाहीत.

या पार्श्वभूमीवर सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सिमा) ने महावितरणने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करून अखंडित दर्जेदार व विश्वासार्ह वीजपुरवठा करावा, ओव्हरलोड ट्रान्स्फॉर्मरची क्षमता वाढवावी आणि नवीन वीजभान मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, अशी मागणी केल आहे. अन्यथा उद्योजकांच्या हितासाठी 'सिमा'च्य नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अस इशाराही संघटनेने दिला आहे.

उद्योजकांच्या मागण्या

अखंडित, दर्जेदार व विश्वासार्ह वीजपुरवठा. ओव्हरलोड ट्रान्स्फॉर्मरची तातडीने क्षमता वाढविणे. नवीन वीजभार मंजुरीची प्रक्रिया त्वरित पूर्ण करणे. वीज खंडितमुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देणे.

नुकसानाची भरपाई महावितरणने द्यावी, उद्योजकांची मागणी

सिन्नर एमआयडीसीत नवीन उद्योगांच्या आगमनासाठी अखंडित, दर्जेदार आणि पुरेसा वीजपुरवठा अत्यावश्यक असताना, महावितरणच्या निष्काळजीपणामुळे औद्योगिक विकासालाच अडथळा निर्माण होत आहे. या वारंवारच्या वीजखंडितीमुळे उद्योजकांना मोठा आर्थिक फटका बसत असून, काही उद्योजकांनी झालेल्या नुकसानीची भरपाई महावितरणने द्यावी, अशी मागणीही केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news