Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रथमच तीन ध्वजस्तंभ उभारणार

Simhastha Kumbh Mela | कुशावर्त तीर्थ, पंचवटीतील रामतीर्थ, नवीन गोदावरी घाट या तीन स्थळांचा समावेश
Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
वेध सिंहस्थाचे : Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ, नवीन गोदावरी घाट तसेच नाशिक येथे रामतीर्थ परिसरात असे तीन ध्वजस्तंभउभारण्यात येणार असल्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात सिंहस्थ ध्वजाला विशेष महत्त्व आहे. हा ध्वज प्रामुख्याने कुंभमेळा स्नानाच्या मुख्य जागेवर उभारला जातो. त्यामुळे प्रत्येक 'भाविकाला त्याच्या दर्शनाचा लाभहोतो.

Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
Goa Tribal Reservation | आदिवासींचा राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा करा

सिंहस्थात नाशिक येथे रामतीर्थ आणि त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थ येथे सिंहस्थ ध्वज उभारला जातो. सूर्यान सिंह राशीत प्रवेश करण्याच्या खगोलीय घटनेनिमित्त हा ध्वज उभारला जातो. सूर्याचा सिंह राशीत प्रवेश यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणार आहे. त्यामुळे हा ध्वज यावर्षी उभारला जाणार आहे.

कुंभमेळ्यात प्रथमच तीन ध्वज सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन ठिकाणी होत असतो. त्यामुळे आतापर्यंत या दोन्ही ठिकाणी कुशावर्त तीर्थ व रामतीर्थ येथे सिंहस्थ ध्वज उभारला जातात. यावेळी त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त तीर्थाप्रमाणेच गोदावरीच्या नवीन घाटांवरही ध्वज उभारला जाणार आहे. कुशावर्त तीर्थ येथे जागा कमी असून, तेथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्नान करण्याची सुविधा उभारणे अशक्य आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरबाहेर गोदावरी घाट उभारले जात आहेत.

Vedha Singhastha / वेध सिंहस्थाचे
Singhastha Kumbh 2027 | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिकेची मोठी तयारी; 200 कोटींचा ‘ग्रीन बॉण्ड’ बाजारात आणण्याचा प्रस्ताव

या ठिकाणी पाणी प्रवाहित राहावे, यासाठी खालच्या धरणातून जलवाहिनीने पाणी आणून वरच्या भागात टाकले जाणार आहे. त्यामुळे वाहत्या पाण्यात भाविक सिंहस्थ स्नान करू शकतील. भाविकांनी स्नान करावे, यासाठी त्या घाटांवर तिसरा सिंहस्थ ध्वज उभारला जाणार आहे. हा ध्वज उभारल्यानंतर संबंधित संस्थेला त्याची १० वर्षे देखभाल दुरुस्ती करावी लागणार आहे. त्यात प्रत्येक तीन वर्षांनी संबंधितांना ३३ टक्के देयक दिले जाणार आहे.

असा असेल ध्वज

हा ध्वज उभारण्यासाठी त्याचे दर निश्चित करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने टेंडर प्रसिद्ध केले आहे. हे धर्मध्वज प्रामुख्याने ५१ फूट व ३१ फूट उंचीचे असणार आहेत. ध्वजासाठी पितळ, तांबे, कांस्य, स्टेनलेस स्टील हे धातू वापरण्यात येणार आहेत. स्तंभ हे मोल्डिंग पद्धतीने तयार करायचे आहेत. या ध्वजावर समुद्रमंथनातून बाहेर आलेल्या रत्नाच्या प्रतिकृती असणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news