Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील 63 धार्मिक संस्थांचा होणार कायापालट

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ६३ धार्मिक संस्थांचा कायापालट होणार आहे.
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 
Summary

  • त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वाधिक ४८ प्रस्ताव

  • पायाभूत सुविधांसाठी निधी मिळण्याचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील ६३ धार्मिक संस्थांचा कायापालट होणार आहे. साधू-महंतांचे आश्रम, मंदिरे आणि धार्मिक महत्त्वाच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने मागविलेल्या प्रस्तावांची जिल्हास्तरीय छाननी पूर्ण झाली आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik District Drought | नाशिक जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी 64,527 विकास व जलसंधारण कामांचा भव्य आराखडा तयार

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने विविध निकषांनुसार तपासणी करून हे प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी कुंभमेळा प्राधिकरणाकडे सादर केले आहेत. त्यामुळे मंजुरीनंतर संबंधित संस्थांना सुविधा उभारण्यासाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा प्रशासनाला प्राप्त ६३ प्रस्तावांमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्याचा सर्वाधिक वाटा असून, तेथील ४८ संस्थांनी प्रस्ताव सादर केले आहेत. सिन्नर तालुक्यातून पाच, दिंडोरीतून चार, इगतपुरीतून तीन, नाशिकमधून दोन, तर निफाड तालुक्यातून एका संस्थेचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाढले मतभेद

या प्रस्तावांमधून धार्मिक संस्थांनी कायमस्वरूपी बांधकामे, शौचालये, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सांडपाणी व्यवस्थापन, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंती आणि भाविकांसाठी निवास व्यवस्था उभारण्याकरिता निधीची मागणी केली आहे. दरम्यान, कुंभमेळा प्राधिकरणाकडून या प्रस्तावांना मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित धार्मिक स्थळानावरील सुविधांचा विस्तार होणार आहे.
सिंहस्थ काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांना स्वच्छता, पाणी, निवास आणि अन्य मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, प्रस्तावांना अंतिम मंजुरी आणि निधीवाटपानंतरच प्रत्यक्ष कामांना सुरवात होऊ शकणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news