धक्कादायक | नाशिक जिल्हा रुग्णालयात गुप्ती बाळगणारा गजाआड

जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news
जिल्हा रुग्णालय नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात कक्षात एक युवक गुप्ती घेऊन फिरताना आढळून आला. त्यास पोलिस चौकीतील पोलिसांनी पकडून सरकारवाडा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

नीलेश तानाजी लहांगे (२७, रा. ओझर मिग) असे संशयिताचे नाव आहे. रुग्णालयातील अपघात कक्षात गुरुवारी (दि.१३) रात्री अकरा वाजता रुग्णाचे नातलग गोंधळ घालत असल्याचे समजले. त्यानुसार रुग्णालयातील पोलिस चौकीतील पोलिस अंमलदार शरद पवार यांनी कक्षात धाव घेतली. त्यावेळी नीलेशची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे पाठीला लपवलेली गुप्ती आढळून आली. त्याला सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा-

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news