Ashok Kharat Case Update | 'समता' पतसंस्थेतील चाकणकर नावाच्या खात्यांचे 'खरात' कनेक्शन; 2.40 कोटींच्या व्यवहाराने खळबळ

Ashok Kharat Case Update |'समता' पतसंस्थेत चाकणकर नावे असलेल्या चार खात्यांतून २ कोटी ४० लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
moneyPudhari
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा

'समता' पतसंस्थेत चाकणकर नावे असलेल्या चार खात्यांतून २ कोटी ४० लाखांचे व्यवहार झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. प्रतिभा चाकणकर यांच्यासह त्या चारही खातेधारकांना पोलिसांनी नोटीस पाठवत जबाबासाठी बोलविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यांच्या नावे समतामध्ये खाते आहेत.

जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना पोलिसी दणका! नाशिकच्या नगरसेवकांचे पती रडारवर

त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होऊ शकला नाही, अशा खातेधारकांना पोलिसांनी पोस्टाने नोटीसा बजावल्या आहेत. बहुचर्चित भोंद खरात याने शिर्डीतील काही एजंटांच्या मदतीने रावसाहेब गोंदकर याची ५० कोटी बाजारमूल्य असलेली चार एकर जमीन पाच कोटींमध्ये हडपली.

या प्रकरणी पोलिसांत अशोकखरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह किरण सोनवणे, अरविंद बावक व अशोक तांबे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. यातील अशोक खरात हा पुर्वीपासून अटकेत आहे. तर सोनवणे आणि बावके आता न्यायालयीन कोठडीत आहेत. कल्पना खरात आणि अशोक तांबे हे फरार आहेत.

जालन्याची भूमिगत गटार योजना अंतिम टप्प्यात
Ashok Kharat case |भोंदू अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी; गरोदर महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण

दरम्यान, चाकणकर नावाची चार खाती समता पतसंस्थेत असून त्या खात्यांना भोंदू खरात नॉमिनी असल्याचे समजते. या चार खात्यातून २ कोटी ४० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले आहेत.

मुख्यमंत्र्यांना पोलिसांकडून 'अपडेट'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी बीड दौऱ्यावर होते. बीडकडे जाण्यासाठी ते शिर्डी विमानतळावर आले. त्यावेळी तेथे उपस्थित नगर पोलिसांनी 'शिर्डीत दाखल खरात प्रकरणाच्या गुन्ह्याची' तपासाचे अपडेट दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news