Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांना पोलिसी दणका! नाशिकच्या नगरसेवकांचे पती रडारवर

Nashik Kumbh Mela 2026 | सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, संबंधितांविरोधात पोलिस यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Simhastha Kumbh Mela Nashik
Janori Kumbh Mela 2026Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमध्ये अडथळा आणल्याप्रकरणी महापालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून, संबंधितांविरोधात पोलिस यंत्रणेकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Jalgaon ex corporator video: पोलीस ठाणे की कुस्तीचा आखाडा? जळगावात भाजपच्या माजी नगरसेवक- मोगलीबाबा गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

या तक्रारीनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ कडून प्रभाग क्रमांक ३ ते ५ मधील काही नगरसेवक आणि नगरसेविकांच्या पतींना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. पंचवटीत सिंहस्थाशी संबंधित विविध विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.

विशेषतः रस्त्यांचे काम, पायाभूत सुविधा उभारणी आणि इतर नागरी सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. मात्र, काही लोकप्रतिनिधींनी या कामांमध्ये जाणूनबुजून अडथळे निर्माण केल्याची तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती.

Simhastha Kumbh Mela Nashik
Jalgaon ex corporator video: पोलीस ठाणे की कुस्तीचा आखाडा? जळगावात भाजपच्या माजी नगरसेवक- मोगलीबाबा गटात पोलिसांसमोरच तुफान हाणामारी

या पार्श्वभूमीवर आयुक्त मनीषा खत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस यंत्रणेकडून चौकशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, काही नगरसेवकांची चौकशी पूर्ण झाली आहे. मात्र, काही जण अद्याप संपर्कात नसून 'नॉट रिचेबल' असल्याचे समजते. संबंधित व्यक्ती चौकशीपासून दूर राहत असल्याने ते फरार असल्याचीही चर्चा सुरू आहे.

लोकप्रतिनिधींवर कारवाईची शक्यता

सिंहस्थ कुंभमेळा लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, त्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. सार्वजनिक हिताच्या कामांमध्ये अडथळा आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या कारवाईमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, अगामी काळात काही लोकप्रतिनिधींवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news