Ashok Kharat case |भोंदू अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी; गरोदर महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण

आतापर्यंत एकूण १४ गुन्हे दाखल, ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे
Ashok Kharat case
न्यायालयाने आज भोंदू अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.Pudhari Photo.
Published on
Updated on

ashok kharat police-custody nashik pregnant woman assault case

नाशिक : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू बाबा अशोक खरात याला तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी बुधवारी (दि. ८) विशेष तपास पथकाने (SIT) ताब्यात घेतले होते. आज (दि. ९) त्याला नाशिक न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशोक खरातवर एकूण १४ गुन्‍हे दाखल

अशोक खरातवर आतापर्यंत एकूण १४ गुन्हे दाखल झाले असून, त्यापैकी ८ गुन्हे लैंगिक शोषणाचे आहेत. सध्या ज्या गुन्ह्यासाठी त्याला अटक करण्यात आली आहे, त्यात त्याने एका सात महिन्यांच्या गरोदर महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. पीडित महिलेच्या पतीला 'तुझ्या पत्नीला दुष्ट शक्तींपासून वाचवावे लागेल आणि तिला मुलगाच होईल' असे आमिष दाखवून खरातने तिला आपल्या कार्यालयात विधीसाठी बोलावले होते. या विधीच्या बहाण्याने त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले.

Ashok Kharat case
Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरातचा अमानुष चेहरा! अल्पवयीन मुलीला केबल वायरने करंट देऊन केला अत्याचार

न्यायालयात जोरदार युक्तीवाद

आजची सुनावणी न्यायमूर्ती बी. एन. ईच पुराणिक यांच्यासमोर पार पडली. आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी वकिलांनी यावेळी जोरदार युक्तिवाद केला. "खरातने विधीच्या नावाखाली गरोदर महिलेवर अघोरी कृत्य आणि अत्याचार केले आहेत. हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असून, यामागील मुख्य धागेदोरे शोधण्यासाठी सखोल तपासाची गरज आहे," असे सांगत तपास अधिकाऱ्यांनी सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर १३ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

Ashok Kharat case
Ashok Khart Case : लग्न करण्याचे आमिष दाखवत खरातने केले विवाहितेचे लैंगिक शोषण : संबधित पिडीता गर्भवती!

SIT कडून सखोल तपास सुरू

अशोक खरातच्या अघोरी कृत्यांचा पर्दाफाश करण्यासाठी एसआयटी (SIT) सध्या कसून चौकशी करत आहे. पोलीस कोठडीच्या या पाच दिवसांच्या काळात आरोपीची समोरासमोर बसून चौकशी केली जाणार आहे. तसेच, या प्रकरणातील फिर्यादी आणि साक्षीदारांना उपस्थित राहून त्यांच्या जबाबांची पडताळणी करण्यावर एसआयटीचा भर असणार आहे. या काळात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Ashok Kharat case
Ashok Kharat Case | पंचवटीतील 'त्या' बड्या डॉक्टरचे भोंदू बाबाशी काय कनेक्शन? लैंगिक शोषणात वैद्यकीय मदतीचा संशय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news