Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या वाहनतळासाठी शिंदे मळ्यातील 1 हेक्टर 13 आर जमीन अधिग्रहित होणार

Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण सोहळा आणि पर्वणी काळातील भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
Parking
ParkingPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर ध्वजारोहण सोहळा आणि पर्वणी काळातील भाविकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. यासाठी नाशिक तालुक्यातील शिंदे मळा परिसरातील सर्व्हे क्रमांक ०६ मधील १ हेक्टर १३ आर जमीन तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्याचा प्रस्ताव कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.

Parking
Nashik District Drought | नाशिक जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी 64,527 विकास व जलसंधारण कामांचा भव्य आराखडा तयार

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त कुंभमेळा आयुक्त कमलाकर रणदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेला पत्र पाठवून सुधारित प्रस्तावानुसार कायदेशीर प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करण्याची विनंती केली आहे.

३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वाहनतळासाठी या जागेचा वापर केला जाणार आहे. तर १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या कालावधीत पर्वणीसाठी अंतर्गत वाहनतळ, होल्डिंग आणि स्टेजिंग एरिया म्हणून ही जागा वापरण्याचे नियोजन आहे.

Parking
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील 63 धार्मिक संस्थांचा होणार कायापालट

गोदावरी स्नानघाट परिसर भाविकांची गर्दी वाढल्यास त्यांना सुरक्षितपणे थांबवण्यासाठी महसूल विभाग आणि नाशिक शहर पोलिस विभागाने संयुक्त पाहणी केली आहे. या जागेवर भूपार्टीकरण, बॅरिकेडिंग, स्वतंत्र आगमन-निर्गमन मार्ग आणि पथदिव्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी संयुक्त मोजणी, जागेचा ताबा घेताना आणि परत देताना व्हिडिओोग्राफी व छायाचित्रांचे जिओ-टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. मोजणीपूर्वी जागेचे अक्षांश-रेखांश निश्चित करून पंचनामा करावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news