Shardiya Navratri festival|शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ

घटस्थापना तयारीला वेग; पूजासाहित्य खरेदीसाठी महिलांची लगबग
Shardiya Navratri festival|शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
Published on: 
Updated on: 

नाशिक : शक्तीची उपासना, साधना असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी (दि. ११) प्रारंभ होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घटस्थापनेच्या तयारीला वेग आला असून, पूजेसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत महिलांची लगबग सुरू आहे. पूजासाहित्याची दुकाने, फुलांची दुकाने तसेच पूजेच्या वस्तू विक्रीच्या ठिकाणी ग्राहकांची वर्दळ वाढलेली दिसत आहे.

पंचांगातील तिथींच्या विशेष संयोगामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात रविवारी (दि. ११) घटस्थापना होणार असून, सोमवारी (दि. १९) अष्टमी आणि नवमीचे पूजन एकाच दिवशी केले जाणार आहे. त्यानंतर मंगळवारी (दि. २०) विजयादशमी साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नवरात्रातील | विविध धार्मिक विधींचे नियोजन करताना भाविकांनी तिथींकडे बघायला हवे, असे ज्योतिषाचार्यांकडून सांगण्यात आले आहे.

अष्टमी आणि नवमी एकाच दिवशी आल्याने सोमवारी (दि. १९) दुर्गाष्टमी पूजन, संधीपूजा, महागौरी व सिद्धिदात्री देवीची आराधना, हवन आणि कन्यापूजन या विधींना महत्त्व राहणार आहे. नवरात्रोत्सवात देवीची स्थापना करून नऊ दिवस उपवास, जप, नामस्मरण, देवीस्तोत्र पठण, होमहवन आणि जागरणाच्या माध्यमातून आदिशक्तीची आराधना करण्यात येणार आहे.

त्यामुळे बाजारपेठेतून देवीस्तोत्र, आदिशक्तीचे दुर्गा सप्तशती, नवदुर्गा पाठ, दुर्गा स्तुती अशा धार्मिक पुस्तके घेण्याकडे महिलांचा कल वाढलेला असून, विविध पूजेचे साहित्य घेण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. विविध देवी मंदिरे आणि घरोघरी घटस्थापनेच्या तयारीला वेग आला असून, नवरात्रोत्सवाचे भक्तिमय वातावरण निर्माण होत असलेले दिसून येत आहे.

Shardiya Navratri festival|शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
Nashik Ashram schools |१,०५८ आश्रमशाळांमध्ये एकाच दिवशी पटपडताळणी

शारदीय नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदेला शास्त्रोक्त पद्धतीने घटस्थापना करावी. ज्या भाविकांना शक्य आहे, त्यांनीच नऊ दिवस उपवास करावा. जप, नामस्मरण आणि देवीस्तोत्र पठणातून आदिशक्तीची आराधना करावी. शक्तीची उपासना, साधना आणि जागराचा उत्सव भक्तिभावाने साजरा करावा.

- ज्योतिषाचार्य सौरभ नंदकुमार हरदास गुरुजी, नाशिक.

Shardiya Navratri festival|शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ
Nashik News : कारागृहातील स्मृतिकक्ष जपतोय ‘श्यामची आई’च्या राष्ट्रीय गौरवाच्या आठवणी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news