Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यानिमित्त नाशिकमध्ये होणार दोन अनोखे विश्वविक्रम; गिनीज बुकमध्ये नोंद होणार

Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ ध्वजारोहणाच्या निमित्ताने दोन विश्वविक्रमांची तयारी
Simhastha Kumbh Mela Nashik
Simhastha Kumbh Mela NashikPudhari News Network
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहरात दोन विश्वविक्रमांची नोंद करण्याची तयारी सुरू आहे. यात पहिला विश्वविक्रम रविवारी (दि. २५) शंखनादाच्या माध्यमातून नोंदवला जाणार आहे. तर दुसऱ्या विश्वविक्रमाची नोंद ध्वजारोहणाच्या दिवशी शनीवारी (दि. ३१) सहा जनजातीय समाजातील ६५० आदिवासी बांधवांच्या सहभागातून दीप प्रज्वलित करून या दिव्यसंध्येला होणाऱ्या गोदावरी महाआरतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Simhastha Kumbh Mela Nashik
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाढले मतभेद

या दोन्ही विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये होणार असल्याची माहिती नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात रविवारी (दि. १८) सिंहस्थ कुंभ प्राधिकरण, नाशिक मनपा आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत आयुक्त शेखर सिंह यांनी ही माहिती दिली.

त्यानुसार रविवारी (दि. २५) सायंकाळी ५ ते ६ दरम्यान अनंत विजय शंखनाद समूहातील ५०१ शंखवादक एकाच वेळी शंखनाद करून विश्वविक्रम नोंदवणार असल्याची माहिती समूहाच्या प्रतिनिधींनी दिली.

तर ध्वजारोहणाच्या दिवशी सायंकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महाआरतीत त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, कळवण आणि सटाणा आदी जनजातीय बहुल भागातील ६५० पाड्यांमधील सुमारे ६ हजार ५०० आदिवासी बांधव सहभागी होणार असून, गोदावरी तीरावर भव्य स्वरूपत दीप प्रज्वलित करून या दिव्यसंध्येला होणाऱ्या महाआरतीचा विश्वविक्रमही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंदवला जाणार असल्याचे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे समन्वयक प्रदीप बच्छाव यांनी स्पष्ट केले.

तसेच आगामी सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी संवर्धन, जनजातीय समाजाच्या सांस्कृतिक परंपरांचा गौरव आणि सामाजिक समरसतेचा संदेश देण्यासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने 'जनजाती गौरव महाआरती'चा संकल्प करण्यात आला असून,

Simhastha Kumbh Mela Nashik
Trimbakeshwar Drought | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये 97 टक्के गावांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण

त्यानुसार शनीवारी (दि. ३१) रामतीर्थावर गोदा महाआरतीनंतर नाशिक जिल्ह्यातील ६५० जनजातीय पाड्यांमध्ये आरतीचे आयोजन करण्याचे नियोजन असल्याचे रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी यांनी सांगितले.
यावेळी भक्तिचरणदास महाराज, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत राधाकृष्ण गायधनी, महाआरती समन्वयक प्रदीप बच्छाव आणि प्रसिद्धिप्रमुख राजेंद्र फड यांच्यासह उपाध्यक्ष शांताराम भानोसे, नरसिंहकृपा प्रभू, सचिव मुकुंद खोचे, प्रफुल्ल संचेती, धनंजय बेळे, शिवाजी बॉर्डर्डे, वैभव क्षेमकल्याणी, चिराग पाटील, विनीत पिंगळे, चैतन्य गायधनी, वृषाली घोलप, योगेश गर्गे, अक्षय शेराटे, प्रल्हाद माशळकर, राज हिरे आणि सोनाली गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news