Trimbakeshwar Drought | नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये 97 टक्के गावांची पंचनामे प्रक्रिया पूर्ण

Trimbakeshwar Drought | १,३३९ पैकी १,२९३ गावांचे पंचनामे पूर्ण; चांदवड, निफाड, त्र्यंबकेश्वरमध्ये कामाला गती देण्याचे आव्हान
Drought
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खरीप हंगाम २०२६ मध्ये पावसाच्या तुटीमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेल्या नाशिक जिल्ह्यात पीक पंचनाम्याच्या कामाला वेग आला असून, जिल्ह्यातील एकूण १ हजार ३३९ गावांपैकी १ हजार २९३ गावांतील पंचनामे पूर्ण झाले आहेत. यादृष्टीने पंचनाम्यांची गावनिहाय प्रगती ९७ टक्क्यांवर पोहोचली असून, आतापर्यंत ४ लाख १४ हजार ७६०.८० हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यात ४ लाख ६ हजार ३०० शेतकऱ्यांची नोंद झाली आहे.

Drought
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठी 21 इच्छुकांनी घेतली 'एनओसी'

दरम्यान, शासनाच्या सुधारित सर्वेक्षणानुसार ट्रीगर-२ अंतर्गत चांदवड, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचाही दुष्काळी परिस्थितीच्या कक्षेत समावेश झाल्यामुळे या तालुक्यांतील पंचनाम्यांना गती देण्याचे नवे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्यात यापूर्वी ट्रीगर-१ अंतर्गत १० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. यामध्ये बागलाण, मालेगाव, नांदगाव, देवळा, कळवण, इगतपुरी, पेठ, सुरगाणा, सिन्नर आणि येवला तालुक्याचा समावेश आहे.

Drought
Nashik Water Scarcity | नाशिक जिल्ह्यात पाणीबाणीचे गंभीर संकट; 700 गाव-खेड्यांत पाणीबाणी; 900 टँकरने पाणीपुरवठा

आता सुधारित सर्वेक्षणानुसार ट्रीगर-२ लागू करण्यात आल्यामुळे चांदवड, निफाड आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचाही दुष्काळी परिस्थिती कक्षेत समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १५ पैकी १३ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याचे चित्र आहे.

त्या दृष्टीने दुष्काळी सवलती आणि संभाव्य मदतीसाठी नुकसानग्रस्त क्षेत्र, बाधित शेतकरी आणि पिकांच्या नुकसानीची अचूक नोंद महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे नव्याने समाविष्ट झालेल्या तीन तालुक्यांत पंचनाम्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करणे आवश्यक आहे. आधीच्या १० तालुक्यांमध्ये पंचनाम्यांची प्रगती समाधानकारक असली, तरी उर्वरित गावांतील काम पूर्ण करण्याबरोबरच नव्या तालुक्यातील नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे.

Drought
Nashik Municipal Corporation | नाशिक शहरात डासांच्या नियंत्रणासाठी आणि पेस्ट कंट्रोलसाठी मनपाकडून 40 कोटींचा महाविशाल ठेका

सहा तालुक्यांत शंभर टक्के काम

पंचनाम्यांच्या तालुकानहाय आकडेवारीनुसार, नांदगाव, देवळा, कळवण, सटाणा, इगतपुरी, पेठ आणि सिन्नर या तालुक्यांमध्ये गावनिहाय पंचनामे पूर्ण झाल्याची नोंद आहे. बागलाणमध्ये १७२ पैकी १६८ गावांचे, मालेगावमध्ये १५१ पैकी १२१ गावांचे, तर येवलात १२४ पैकी ११२ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे या तीन तालुक्यांतील उर्वरित गावांमध्येशी काम पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.

प्रत्यक्ष बाधित क्षेत्र, शेतकऱ्यांची अचूक नोंद आवश्यक

दुष्काळाची तीव्रता आणि नुकसानीचे स्वरूप तालुकानहाय वेगवेगळे असल्यामुळे पंचनाम्याची केवळ गावनिहाय टक्केवारी पुरेशी ठरणार नाही. प्रत्यक्ष बाधित क्षेत्र आणि शेतकऱ्यांची नोंद अचूक होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पंचनामे पूर्ण झालेल्या गावांतील माहितीची पडताळणी आणि नव्याने दुष्काळी क्षेत्रात आलेल्या चांदवड, निफाड व त्र्यंबकेश्वरमधील सर्वेक्षण यावर आगामी काळात मदतवाटपाचे चित्र अवलंबून राहणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news