North Maharashtra Drought | उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाचा गंभीर दाह! 54 पैकी तब्बल 49 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

North Maharashtra Drought | नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना वेग देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.
Drought News
DroughtPudhari
Published on: 
Updated on: 


नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करताना, राज्यातील २६५ तालुक्यांचा समावेश केला असून, त्यात नाशिक विभागातील ५४ पैकी ४९ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाच जिल्ह्यांमध्ये दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांना वेग देण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Drought News
Land Scam SIT | 'नाशिक डायोसेशन ट्रस्ट'च्या जमीन व्यवहारांची एसआयटी चौकशी

पावसाने दिलेली दीर्घ ओढ, खरीप पिकांची झालेली वाताहत आणि उपलब्ध पाणीसाठ्यावरील वाढता ताण यांमुळे नाशिक विभागावर दुष्काळाचे सावट अधिक गडद झाले आहे. या दुष्काळाचा सर्वाधिक थेट परिणाम पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनासमोर पाणीटंचाई निवारणाचे मोठे आव्हान आहे.

यंदा पावसाचा खंड आणि ग्रामीण भागातील जलस्रोतांवर वाढलेला ताण लक्षात घेता, पुढील उन्हाळ्यापर्यंतचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आतापासूनच गावनिहाय नियोजनाची गरज निर्माण झाली आहे. कोणत्या गावाला, कोणत्या जलस्रोतावर अवलंबून राहावे लागणार आहे, कोणत्या विहिरींचे अधिग्रहण करावे लागेल, कुठे टँकरची आवश्यकता भासू शकते, याचा

आराखडा प्रशासनाला तयार करावा लागणार आहे. नाशिक विभागातील ५४ पैकी ४९ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट ओढवल्यामुळे शेतकरी, पशुपालक आणि ग्रामीण नागरिकांना तातडीचा दिलासा देण्याबरोबरच आगामी उन्हाळ्यासाठी पाणी व चारा सुरक्षित ठेवण्याचे दुहेरी आव्हान प्रशासनासमोर आहे.

दुष्काळी उपाययोजनांची घोषणा झाली असली, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी गावपातळीपर्यंत किती वेगाने पोहोचते, यावरच या संकटाचा सामना करण्याची दिशा ठरणार आहे. यात प्रत्यक्ष पीकपरिस्थितीचे पंचनामे, नुकसानीचे मूल्यांकन आणि त्यानुसार मदतीचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.

Drought News
Nashik Ganpati Visarjan 2026: नाशिक पोलिसांचा दणका, अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढलं; एक मंडळ- एक ढोलपथकाचा नियम

नाशिक विभागावर दृष्टिक्षेप:

  • नाशिक : जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, नांदगाव, सुरगाणा, इगतपुरी, पेठ, सिन्नर, येवला आणि देवळा या तालुक्यांचा समावेश दुष्काळाच्या यादीत आहे, तर त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, निफाडमध्ये दिलासादायक पाऊस झाल्यामुळे या तालुक्यांना वगळले आहे. मात्र चांदवड तालुकाही यादीतून वगळल्यामुळे या तालुक्यातील शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

  • धुळे : जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा आणि शिरपूर या चारही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त भागाच्या यादीत आहे.

  • जळगाव : जिल्ह्यात सर्व १५ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट आहे. यात एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल या तालुक्यांचा समावेश आहे.

  • नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व सहा तालुके दुष्काळी म्हणून निश्चित केले आहेत. यात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी या तालुक्यांचा समावेश आहे.

  • अहिल्यानगर : जिल्ह्यातील सर्व १४ तालुके दुष्काळी यादीत आहेत. नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, अकोले, कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता या तालुक्यांचा समावेश आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news