Nashik Senapati Sidoji Naik Nimbalkar Samadhi Restoration| सेनापती सिदोजी नाईक निंबाळकर समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्प

Nashik Senapati Sidoji Naik Nimbalkar Samadhi Restoration | सेनापती सिदोजी नाईक निंबाळकर समाधीच्या जीर्णोद्धाराचा संकल्प
Nashik Senapati Sidoji Naik Nimbalkar Samadhi Restoration
सिन्नर : विश्रामगड येथे सेनापती सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या समाधीचे पूजनप्रसंगी वंशज शार्दुल आणि शंतनु निंबाळकर. समवेत शिवराष्ट्र परिवार, आधार फाउंडेशनचे सदस्य.
Published on: 
Updated on: 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

पट्टा किल्ला ऊर्फ विश्रामगड येथे स्वराज्याचे सेनापती सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र आणि आधार फाउंडेशनच्या पुढाकाराने ऐतिहासिक वारसा संवर्धनाचा उपक्रम हाती घेण्यात आला. यानिमित्त समाधिस्थळी पूजन करून जीर्णोद्धाराचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी येथून झाली.

शिवप्रेमींचा ऐतिहासिक वारसा जतनासाठी निर्धार

दुर्लक्षित होत चाललेल्या ऐतिहासिक समाधीचे जतन करून शूरवीरांचा इतिहास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे शिवराष्ट्र परिवाराचे अध्यक्ष प्रशांत साळुंखे यांनी सांगितले.

त्यानंतर पट्टा किल्ल्यावर सिदोजी नाईक निंबाळकर यांच्या वंशज शार्दुल आणि शंतनु निंबाळकर यांच्या हस्ते समाधीचे पूजन करण्यात आले. इतिहास व्याख्याते भूपाल शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर इतिहास अभ्यासक दीपक कर्पे यांनी सिदोजी नाईक यांच्या पराक्रमाचा आणि बलिदानाचा इतिहास उलगडला.

Nashik Senapati Sidoji Naik Nimbalkar Samadhi Restoration
Nashik New Additional Tehsildar Offices|विभागात आठ स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालये, राज्यभरात नऊ कार्यालयांना मंजुरी

यावेळी दीपकराव कर्पे, डॉ. महादेव अरगडे, संतोष शेळके, सुकदेव इल्हे, भूपाल शेळके, बाळासाहेब आहेर, भाऊसाहेब वैद्य, डॉ. रवी साबळे, बाळासाहेब पिंगळे, नंदकुमार रहाणे, पंढरीनाथ घुले, सेवानिवृत्त वनाधिकारी शिवाजीराव फटांगरे, वनरक्षक सोनाली डगळे, सागर कोळगे, बन्सी मदने, सुभाष घनदाट यांच्यासह शिवप्रेमी व इतिहासप्रेमी उपस्थित होते.

Nashik Senapati Sidoji Naik Nimbalkar Samadhi Restoration
Nashik District Consumer Protection Council Appointments-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.