Nashik District Consumer Protection Council Appointments-जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती

District Consumer Protection Council Appointments- जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती, ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींना दहा जागा
Consumer Protection
Consumer Protection file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण, तक्रारींचे निराकरण आणि ग्राहक चळवळीला बळकटी देण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर विविध प्रवर्गातील २२ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत या नियुक्त्त्यांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींना सर्वाधिक १० जागा देण्यात आल्या आहेत. दरम्यान, काही प्रवर्गातील जागा रिक्त राहिल्यामुळे त्या भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.

ग्राहक संरक्षण अधिनियम २०१९ आणि २९ ऑगस्ट २०२२ च्या शासन निर्णयानुसार ही प्रक्रिया राबविण्यात आली. जिल्हा पुरवठा शाखेमार्फत २५ ऑगस्ट २०२६ रोजी जाहिरात प्रसिद्ध करून २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. प्राप्त अर्जाच्या छाननीनंतर १७ नोव्हेंबरला निवड समितीची बैठक झाली. यात पात्र उमेदवारांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

ग्राहक संघटना प्रतिनिधी म्हणून राजेंद्र बागूल, वसंत दंडवते, प्रकाश जोशी, राजेंद्र जडे, उत्तम काळे, सुभाष जगताप, हिरालाल जाधव, विलास देवळे, दीपक शिनकर आणि दादाभाऊ केदारे यांची नियुक्ती झाली. तर शाळा-महाविद्यालय प्रवर्गातून दीपक व्याळीज आणि स्वाती लोहारकर, वैद्यकीय क्षेत्रातून डॉ. दीपाली घुले व डॉ. संजय पाटील, व्यापार उद्योगातून हरीष मारू व अमोल पूरकर, पेट्रोल-गॅस विक्रेते प्रवर्गातून अंकुश हगवणे व विजय ठाकरे, शेतकरी प्रवर्गातून वाल्मीक सांगळे व सविता तुंगार, तर महानगरपालिका - नगर परिषद प्रवर्गातून सुरेश पाटील व भूषण जाधव यांची नियुक्ती झाली.

Consumer Protection
Nashik Weather Forcast | नाशिकमध्ये सकाळी हुडहुडी, दुपारी उन्हाचा चटका; बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका न झाल्याने संबंधित प्रतिनिधींची निवड रखडली आहे. तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती प्रवर्गातून अर्ज प्राप्त न झाल्याने या जागाही रिक्त आहेत. या जागांसाठी नव्याने जाहिरात देण्यात येणार आहे.

Consumer Protection
Nashik New Additional Tehsildar Offices|विभागात आठ स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालये, राज्यभरात नऊ कार्यालयांना मंजुरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.