

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सातपूर येथील चिंतामणी क्लासेसचा संचालक गणेश राजेंद्र सोनवणे (रा. शिवाजीनगर) याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. सातपूर पोलिस ठाण्यात दाखल प्रकरणात आरोपी गणेश राजेंद्र सोनवणे (३२, रा. शिवाजीनगर, सातपूर) याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली.
हा गुन्हा दि. १ व ३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी अशोकनगर येथील चिंतामणी क्लासेसमध्ये घडला होता. आरोपी हा क्लासचालक असून, फिर्यादीची अल्पवयीन मुलगी या क्लासमध्ये शिकत होती. क्लास सुटल्यानंतर झाडू काढण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला वर्गात थांबवून तिच्याशी अश्लील चाळे करत विनयभंग क लैंगिक अत्याचार केला.
हा प्रकार पालकांना सांगितल्यास बदनामी होईल, अशी धमकी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक श्याम् जाधव यांनी करत आरोपीविरोधात पुरावे गोळा करत दोषारोपपत्र दाखल केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश आर एन. पांढरे यांनी साक्षीदार, पंचनामा क पुरावे ग्राह्य धरत आरोपीला पोक्सो कायद्यानुसार जन्मठेप व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारीरी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी बाजू मांडली. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, मोनिका खरे, हवालदार रंजना गायकवाड यांनी पाठपुरावा केला.