

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ताबा महापालिकेवर मिळविण्याच्या सत्ता समीकरणात भाजपविरोधात एकत्र आलेली शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकमध्येच राजकीय अडचणीत सापडली आहे. भाजपविरोधात अपेक्षित आक्रमकता दाखवण्यात शिंदे गट अपयशी ठरलेला असताना, शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अक्षरशः निष्प्रभ बनलेली आहे.
या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गद्दारी हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत थेट रस्त्यावर उतरलेली दिसून येत आहे. नाशिक हा स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि शिवसेनेच्या निष्ठावान कार्यकत्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. बाळासाहेबांच्या सभांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि त्यातून घडलेला कट्टर शिवसैनिक हा नाशिकच्या राजकारणाचा आत्मा होता.
मात्र, शिवसेना फुटल्यानंतर तयार झालेल्या शिंदेंच्या शिवसेनेला आजही गद्दारीचा - शिक्का पुसता आलेला नाही, हे वास्तव नाकारता येत नाही. गेल्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रभर गाजलेला 'पन्नास खोके, एकदम ओके' हा नारा नाशिकच्या राजकारणात पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला आहे. हाच मुद्दा हाती घेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना घरोघरी जाऊन थेट जाब विचारणार आहे. शिवसेना कुणासाठी आणि कशासाठी फोडली? हा प्रश्न सामान्य मतदारांच्या मनात रोवण्याची आखणी निष्ठावंत
शिवसैनिकांनी केली आहे. या गंभीर आरोपांवर शिदे सेनेकडून आजतागायत शिवसैनिकांना किया नाशिककरांना समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाला शहरात बसलेला फटका आणि त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडनुकांमधील मर्यादित यश हे याचेच द्योतक मानले जात आहे.
राष्ट्रवादी ठरतेय निष्प्रभा दुसरीकडे अजित पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक शहरात नेत्याविना संघटना अशीच दिसून येते. राज्यस्तरीय नेतृत्वाचा नाशिककडे असलेला थंड प्रतिसाद, कार्यकत्यांमधील संभ्रम आणि संघटनात्मक डिसाळपणा यामुळे राष्ट्रवादीचे अस्तित्व केवळ सत्तेच्या समीकरणापुरतेच उरल्याचे चित्र आहे. काही महत्त्वाच्या प्रभागांमध्ये शिंदे गट व राष्ट्रवादीतील संशयास्पद साटेलोटेही विरोधकांच्या नजरेतून सुटलेले नाही.
महत्वाचे म्हणजे नाशिक शहरातील पाणीपुरवठा, वाहतूक कोंडी, स्मार्ट सिटीची रखडलेली कामे, बेरोजगारी, नागरी सुविधा आणि आगामी कुंभमेळ्याची तयारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर लिदे सेनेने किंवा राष्ट्रवादीने ठोस भूमिका मांडलेली नाही.
सतेसाठी केलेली ही आघाडी नाशिककरांच्या प्राप्नांबाबत मात्र मौन पाळून आहे, असा आरोप आता उघडपणे होत आहे. महापालिका निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना नाशिकमध्ये गद्दारी विरुद्ध निष्ठा हीच निवडणूक रेषा ठरण्याची विन्हे स्पष्ट दिसत आहेत. शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना राजकीय आरसा दाखवणारा निकाल नाशिककर देणार का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
उद्धव-राज कोणता बूस्टर देणार?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त सभा शुक्रवारी (दि. ९) नाशिकमध्ये होत आहे. या सभेतून महाविकास आघाडीला आणि खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची मनसे यांना बूस्टर डोस मिळणार आहे. आगामी काही दिवसांची प्रचाराची दिशा काय असेल? याचा रोडमॅप या दोन्ही पक्षांतील उमेदवार आणि कार्यकत्यांना मिळणार आहे. एकूणच शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासमोरील अडचणीत या संयुक्त सभेनंतर अधिक भर पडणार आहे.