Vani Monkey Attack: सप्तशृंग गडावर माकडांच्या हल्ल्यात ६ वर्षीय बालक जखमी

दुपारी दोनच्या सुमारास वैजापूर येथील कार्तिक शेलार या चिमुकल्यावर माकडांनी अचानक शिवालय तलाव परिसरात हल्ला.
Monkey Attack
Monkey AttackPudhari
Published on
Updated on

सप्तशृंगगड : साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशृंग गडावर सध्या माकडांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी (दि. २९) दुपारी दोनच्या सुमारास वैजापूर येथील कार्तिक शेलार (६) या चिमुकल्यावर माकडांनी अचानक शिवालय तलाव परिसरात हल्ला करत चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात असलेल्या भाविकांत एकच धावपळ उडाली. सुदैवाने आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी अजय गांगुर्डे यांनी तत्काळ धाव घेत जखमी बालकास ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल केले.

Monkey Attack
Nashik Municipal Corporation | बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा

मंदिर परिसर, शिवालय तीर्थ, सप्तशृंग गड, पिकनिक पॉईंट, पायरी, दर्शन रांग या ठिकाणी मोठ्या संख्येने मुक्तपणे माकडांचा वावर आहे. भाविकांच्या हातातील प्रसाद, पिशव्या, पूजेचे साहित्य ओढून घेणे, लहान मुलांवर हल्ले करणे हे रोजच होत आहे. याबाबत वनविभागाने काहीतरी योग्य उपाययोजना आखत अशा प्रकारच्या हल्ल्यांना प्रतिबंध घालावा अशी मागणी भाविक करत आहे. माकडांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे भाविकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Monkey Attack
Malegaon Mayor Election | महापौरपदाचा सस्पेन्स संपला !

श्री सप्तशृंग गडावर सहा वर्षांच्या बालकावर माकडांचा हल्ला होत असताना वन विभाग गाढ झोपेत आहे. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. मंदिर परिसरासह शिवालय तीर्थ, पिकनिक पॉईंटजवळ माकडांचा सुळसुळाट सर्वांना माहीत असताना ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. भाविकांच्या सुरक्षिततेशी खेळ थांबवावा.

राजेश गवळी, सदस्य, सप्तशृंगगड ग्रामपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news