Nashik Municipal Corporation | बड्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा

Nashik Municipal Corporation | 707 कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाची कारवाई
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal CorporationPudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या निवडणुका आटोपताच प्रशासनाने घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकबाकीदारांच्या दिशेने कारवाईचा मोर्चा वळविला आहे. ७०७ कोटींच्या थकबाकी वसुलीची कार्यवाही कर विभागाने सुरू केली असून, प्रत्येक विभागातील २०० याप्रमाणे १२०० थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा बड्या बजावण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

Nashik Municipal Corporation
Malegaon Mayor Election | महापौरपदाचा सस्पेन्स संपला !

करवसुली मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी शुक्रवारी (दि.३०) कर विभागातील अधिकाऱ्यांसह सहाही विभागीय अधिकाऱ्यांची बैठक बोलविली आहे. गेल्या ऑक्टोबर २०२५ पासून मनपा प्रशासन निवडणूक कामात व्यस्त होते.

विशेषतः करवसुली विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे प्रभागरचना, मतदारयादी तयार करण्याची आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणीची जबाबदारी सोपविण्यात आल्याने ऑक्टोबर महिन्यापासूनच मनपाची करवसुली ठप्प झाली होती. त्यामुळे घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकीचा डोंगर अधिकच वाढला. घरपट्टीच्या थकबाकी वसुलीसाठी मनपाने अभय योजना राबवली.

मात्र करवसुली केंद्रांवर पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे या योजनेचा प्रभावी लाभमनपाला होऊ शकला नाही. घरपट्टी पाणीपट्टी देयक वाटपासाठी मनपाने मक्तेदारांची नेमणूक केली आहे. या मक्तेदारांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाचे कर्मचारी नियुक्त केले जातात. मात्र, निवडणूक कामामुळे ही जबाबदारी पार पाडता न आल्याने करवसुलीत व्यत्यय आला.

Nashik Municipal Corporation
Malegaon Mayor Election | महापौरपदाचा सस्पेन्स संपला !

99 कोटी वसुलीचे दोन महिन्यांत आव्हान

घरपट्टीच्या थकबाकीचा आकडा ७०७ कोटींवर गेला आहे. तर पाणीपट्टीची थकबाकीही २०७कोटींवर गेली आहे. घरपट्टी वसुलीसाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता २६० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. २९ जानेवारीअखेर २१० कोटींची घरपट्टी वसूल झाली असून, उर्वरित दोन महिन्यांत ४९ कोटी वसूल करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे ४३ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसूल झाली असून, आणखी ५० कोटी वसूल करावे लागणार आहेत.

आयुक्तांच्या उपस्थितीत आज आढावा

महापालिका निवडणुकीच्या कामातून सुटका झाल्यानंतर प्रशासनाने आता करवसुलीकडे मोर्चा वळविला आहे. मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कर विभागातील अधिकारी तसेच सहाही विभागीय अधिकाऱ्यांची शुक्रवारी (दि.३०) संयुक्त बैठक बोलविली असून, या बैठकीत घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीचा आढावा घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे थकबाकी-दारांवरील कारवाईची दिशा ठरविली जाणार असल्याची माहिती उपायुक्त (कर) अजित निकत यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news