

सप्तशृंगगड/ कळवण (नाशिक) : साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंग गडावर सोमवार (दि. २२) पासून सप्तशृंगी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. या काळात लाखो भाविक गडावर येणार असल्याने भाविकांना सुलभपणे मातेचे दर्शन घेता यावे यासाठी या नवरात्रोत्सवात मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले राहणार आहे. त्यासाठीचे नियोजन प्रशासन व ट्रस्टने केल्याची माहिती देण्यात आली आहे.
सकाळी ७ वाजता जिल्हा व सत्र न्यायालय प्रमुख अभय लाहोटी यांच्या हस्ते महापूजा व सकाळी साडेनऊला घटस्थापना होईल. रोज सकाळी ७ वाजता महापूजा होईल. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत नांदुरी ते गड खासगी वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने सप्तशृंगगड आणि नांदुरी येथे तात्पुरते बसस्थानक तयार करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवासाठी यावर्षी २५० बसेस ठेवण्यात आल्या आहेत. असल्याने बसस्थानक चांगले विशेष म्हणजे सर्व बस या चांगल्या ठेवण्यासाठी करण्यासाठी प्रशासनासमोर आव्हान आतापासूनच बसेस राखीव ठेवण्याचे काम विभागीय स्तरावर असते. यावर्षी आगार व्यवस्थापनातर्फे सुरू आहे. यात्रा काळात घाट रस्त्याची माहिती असणारे चालक असतील. घाटात तीन ठिकाणी तात्पुरते गॅरेज, दोन क्रेन उभ्या ठेवण्यात येणार आहेत. वाहनचालक नियंत्रणासाठी फिरते पथक अल्कोहोल चाचणी घेतील.
सहा वर्षांपूर्वी नवरात्र उत्सवात अष्टमीच्या दिवशी जोरदार पाऊस झाल्याने बससेवा कोलमडली होती. यादरम्यान बसेस अडकल्याने तीन ते चार तास गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिस प्रशासनाने आणि स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सामोपचाराने वाद मिटवत चार तासानंतर वाहतूक सुरळीत केली होती. तेव्हापासून आगार व्यवस्थापनाने तात्पुरते बसस्थानक चांगलेच करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या सोयीसाठी फ्युनिक्युलर ट्रॉलीची सुविधा उपलब्ध आहे. प्रणाली अवघ्या ३ मिनिटात गडाच्या पायथ्यापासून थेट मंदिरापर्यंत भाविकांना पोहोचवते. त्यामुळे जवळपास ५०० पायऱ्या चढण्याची गरज राहत नाही आणि केवळ तीन मिनिटांत दर्शनासाठी गडावर पोहोचता येते.