

नाशिक : पुढारी न्यूजचे पत्रकार किरण ताजणे यांच्यावर त्र्यंबकेश्वर इथं प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांकडून हा हल्ला करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच आज सप्तश्रृंगी गडावर अवैध पार्किंग ठेकेदाराची अरेरावी केल्याची घटना समोर आला आहे.
त्र्यंबकेश्वरनंतर सप्तश्रृंगी गडावरही पत्रकारांवर पार्किंग कर्मचाऱ्यांची अरेरावी केली आहे. नवरात्रला सोमवारपासून सुरु होत आहे. भाविकांची सध्या तिर्थस्थंळावर गर्दी होत आहे. यामधून स्थानिक ठेकेदार व गुंडाकडून सामान्य भाविकांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहे. फक्त त्रास न देता अवैध रित्या पैसे गोळा करण्याचेही प्रकार घडत आहेत
सप्तश्रृंगी गडावर आज येणाऱ्या भाविकांकडून अवाजवी पैसे मागत, गाड्या रोखण्यात आल्या. ही लोक हे याठिकाणी पार्किगचा अवैधपणे पैसे गोळा करणाऱ्या ठेकदाराची आहेत असे समजते. तसेच पैसे भरल्यानंतर जी पावती दिली जाते त्या पावतीवर कंपनीचे नाव, रजिस्ट्रेशन नंबर वा अमाऊंट नसल्याचे निदर्शनास आले आहे.
भाविकांसह पत्रकारांना दमदाटी
या ठिकाणी अवैध प्रकाराबद्दल विचारणा करण्यात आली असता. पुढारी न्युजच्या पत्रकारांसह इतर पत्रकांरानाही दमदाटी करण्यात आली. पत्रकारच नाही तर सर्वसामान्य भाविकांनाही तोच त्रास होत आहे. अनेक भाविकांकडून मुजोरी दाखवत पैसे उकळले जात आहे. पार्किंसाठी कोणत्याही वैध मार्गाने ठेका न घेता अशा पद्धतीने लूटमार होत असल्याने याचा निषेध होत आहे. तसेच राज्यातील देवस्थानांवरील पार्किंग अरेरावीवर अंकुशाची मागणी भाविकांमधून समोर येत आहे.
दरम्यान शनिवारी त्र्यंबेकेश्वर येथे झालेल्या हल्ल्यात पुढारीचे पत्रकार किरण ताजणे यांना काही गंभीर दुखापती झाल्या आहेत. ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली. प्रवासी गाड्यांच्या पावत्या फाडणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांनी या गुंडांनी तीन ते चार पत्रकारांवर हल्ला होता. जखमी पत्रकारांवर सध्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचवेळी आज रविवारी हा प्रकार समोर आला आहे.