Saptashringgad | सप्तशृंगगडार कीर्तिध्वज मिरवणुकीने दुमदुमला परिसर; महाअष्टमीला भक्तिमय वातावरणात सोहळा संपन्न

Saptashringgad | महाअष्टमीला भक्तीचा जागर; पंचांगपूजेसह शतचंडी यागालाही प्रारंभ
Saptashringgad
Saptashringgad
Published on: 
Updated on: 

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा
उत्तर महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगगडार नवरात्रोत्सवाच्या महाअष्टमीला भक्ती, परंपरा आणि धार्मिक विधீचा अनोखा संगम पाहायला मिळाला. शनिवार - रविवारच्या गर्दीनंतर सोमवारी भाविकांची संख्या काहीशी कमी झाली असली, तरी श्री भगवतीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ कायम होता.

Saptashringgad
Saptashrungi Gad | नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सप्तशृंगगड सज्ज होणार! वाहतूक, पाणी अन् आरोग्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश

माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी देवीचे दर्शन घेत संकल्प आरती केली. दरम्यान, पालखी नगरप्रदक्षिणा, कीर्तिध्वज पूजन आणि शतचंडी यागाच्या प्रारंभाने गडावरील धार्मिक वातावरण अधिकच भारावून गेले.

महाअष्टमीच्या शुभमुहूर्तावर श्री भगवती देवीची पंचामृत महापूजा अण्णासाहेब आर्थिक महाविकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. दुर्गाष्टमीच्या परंपरेनुसार विश्वस्त संस्थेच्या कार्यालयात देवीच्या पालखीचे पूजन केले. त्यानंतर गावातून पालखीची नगरप्रदक्षिणा काढली. या धार्मिक सोहळ्यामुळे गडावरील परंपरेचे दर्शन भाविकांना घडले.

महाअष्टमीच्या धार्मिक कार्यक्रमातील महत्त्वाचा सोहळा असलेल्या श्री भगवतीच्या कीर्तिध्वजाचे विधिवत पूजन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या मुख्य कार्यालयात केले. विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांनी कीर्तिध्वजाचे पारंपरिक मानकरी दरेगाव येथील गवळी परिवार यांच्या हस्ते पूजाविधी झाला.

पूजनानंतर ढोल - ताशांच्या गरज आणि 'श्री सप्तशृंगी माता की जय' च्या जयघोषात कीर्तिध्वजाच्या भव्य मिरवणुकीचा प्रारंभ झाला. यावेळी ग्रामस्थ, भाविक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.

धार्मिक विधिने भक्तिमय वातावरण

महाअष्टमीच्या सायंकाली श्री भगवती मंदिराच्या सभामंडपात शतचंडी याग व होमहवन विधीला धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त विवेक सोनुने यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रघोषात आणि देवीच्या जयघोषात याग सुरू केला.

या धार्मिक विधीचे दर्शन घेण्यासाठी आणि श्री भगवतीचे आशीर्वाद लामावेत, या श्रद्धेने भाविकांणी उपस्थिती लावली. नवरात्रोत्सवातील या महत्त्वपूर्ण धार्मिक सोहळ्यामुळे सप्तशृंगगडार भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

Saptashringgad
Navratri 2025: जगदंबामाता नवरात्रोत्सवासाठी सजले वणी सप्तशृंगगड; पंचामृत महापूजा, आरती, सवाद्य पालखीच्या वेळा जाणून घ्या

पार पडलेल्या या सोहळ्याने महाअष्टमीच्या उत्सवात विशेष रंग भरला. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी कश्मिर संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुह, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे,

नारद आहिरे, श्याम पवार, नाना भामरे, संतोष पाटील, विजय भवरे, पोलिसपाटील शशिकान्त बेनके, संजय देवरे, संदीप बेनके, राजेश गवळी, अजय दुबे, गणेश बर्डे, धनेश गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news