Saptashrungi Gad | नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी सप्तशृंगगड सज्ज होणार! वाहतूक, पाणी अन् आरोग्याचा आराखडा तयार करण्याचे आदेश

Saptashrungi Gad | आयुक्त शेखर सिंह : वाहतूक, पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधांचा आराखडा तयार करा
Saptashrungi Gad Chaitrotsav 2026
Saptashrungi Gad Chaitrotsav 2026
Published on: 
Updated on: 

नाशिक / सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता असल्याने गर्दी व्यवस्थापन, वाहतूक, पिण्याचे पाणी, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य तसेच मूलभूत सुविधांचे आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.

Saptashrungi Gad Chaitrotsav 2026
Nashik Mahila Shetkari | नाशिक जिल्ह्यात महिला शेतकऱ्यांचा डंका! 'सक्षमीकरण' योजनेत 76 हजारांहून अधिक नोंदणी पूर्ण

सप्तशृंगगड येथे कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात गुरुवारी (दि. १) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंता अरुंधती शर्मा, उपवनसंरक्षक राकेश सेपट, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सिंहस्थ काळात नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात येणारे भाविक सप्तशृंग गडासह परिसरातील धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. त्यामुळे गडाची भौगोलिक रचना, रस्ते, पार्किंग आणि भाविकांची सुरक्षित वाहतूक यांचे स्वतंत्र नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Saptashrungi Gad Chaitrotsav 2026
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिका विषय समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर! 8 आणि 9 ऑक्टोबरला रंगणार सभापतीपदाचा संग्राम

बसस्थानक, शटल सेवा, खासगी वाहनांसाठी पार्किंग तसेच अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांसाठी स्वतंत्र मार्ग निश्चित करण्याचेही सांगण्यात आले. त्याचप्रमाणे वणी, नांदुरी व गड परिसरात पिण्याचे पाणी, मोबाईल स्वच्छतागृहे, तात्पुरती रुग्णालये, वैद्यकीय पथके व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गड परिसरातील पायाभूत सुविधांसाठी प्रस्तावित नऊ कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्याचेही सांगण्यात आले.

कचरा व्यवस्थापनावर भर:

सप्तशृंगगडावरील सध्याच्या कचरानिर्मितीचा बेसलाइन डेटा तयार करून त्यानुसार अतिरिक्त मनुष्यबळ, डस्टबिन व कचरा संकलन वाहनांची व्यवस्था करावी. निर्माल्य स्वतंत्रपणे संकलित करून त्यापासून अगरबत्ती, धूपबत्ती तयार करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधावा. ओला कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी डीपीआर तयार करून निधीचे स्रोत निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news