Nashik - दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांत राबविला जाणार 'साप्रा' प्रकल्प

SAPRA Snakebite Awareness Project-सर्पदंशाने होणारे मृत्यू शून्य करण्याचे उद्दिष्ट : जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर पहिलाच प्रयोग
Nashik - दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांत राबविला जाणार 'साप्रा' प्रकल्प
file photo
Published on
Updated on

नाशिक : सर्पदंशामुळे होणारे मृत्यू आणि गंभीर आरोग्यविषयक परिणाम कमी करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि सुरगाणा तालुक्यांमध्ये 'साप्रा' (साप चावण्याबाबत जागरूकता, प्रतिसाद, प्रतिबंध आणि कृती) हा महत्त्वाकांक्षी संशोधन व जनजागृती प्रकल्प राबविण्यात येणार आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद (ICMR) च्या अर्थसाहाय्याने हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

Nashik - दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांत राबविला जाणार 'साप्रा' प्रकल्प
Nashik-Trimbakeshwar Simhastha Kumbh Mela | सिंहस्थासाठी आणखी १,२०० कोटींचा निधी

या प्रकल्पाची अंमलबजावणी 'आयसीएमआर महिला आरोग्य संशोधन राष्ट्रीय संस्था' (मुंबई), 'आदर्श ग्रामीण आरोग्य संशोधन केंद्र' (वणी) आणि शासनाचा 'सार्वजनिक आरोग्य विभाग' यांच्या संयुक्त सहकार्याने केली जाणार आहे. या उपक्रमाला आरोग्यसेवा संचालनालयाची मान्यता मिळाली असून, जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या समन्वयातून हा प्रकल्प राबवला जाईल. या प्रकल्पांतर्गत दिंडोरी तालुक्यातील ३२ आणि सुरगाणा तालुक्यातील १६ अशा एकूण ४८ ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.

Nashik - दिंडोरी, सुरगाणा तालुक्यांत राबविला जाणार 'साप्रा' प्रकल्प
Sankalp Se Siddhi Industrial Development|'संकल्प से सिद्धी'तून औद्योगिक विकासाला नवी दिशा

प्रत्येक ग्रामपंचायतीतून ५ स्वयंसेवकांची निवड केली जाईल. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य, आशा स्वयंसेविका, अंगणवाडीसेविका, बचतगटांच्या महिला, शिक्षक, सुशिक्षित युवक आणि सर्पदंशातून बरे झालेले नागरिक यांचा समावेश असेल. या स्वयंसेवकांना सर्पदंश प्रतिबंध, विषारी सापांची ओळख, योग्य प्रथमोपचार, तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याचे महत्त्व आणि अंधश्रद्धा निर्मूलन याविषयी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षित स्वयंसेवक गावागावांत जाऊन वैज्ञानिक माहितीचा प्रसार करतील. मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी या उपक्रमासाठी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार गटविकास अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, शिक्षण विभाग, ग्रामपंचायती आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त सहभागातून प्रकल्प अतिशय प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे

राज्यातील हा महत्त्वपूर्ण प्रकल्प नाशिक जिल्ह्यात राबविण्यात येत असल्याने ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. सलग चार वर्षांच्या अभ्यासातून मिळणा-या निष्कर्षांच्या आधारे भविष्यात महाराष्ट्रातील इतर सर्पदंशग्रस्त भागांतही असे उपक्रम राबविण्यास मोठी दिशा मिळणार आहे.

- डॉ. सुधाकर मोरे (जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news