Nashik Simhastha Kumbh Mela | तपोवन ते नांदूर शिवारापर्यंत साधुग्रामचा विस्तार; 10 कोटी भाविकांसाठी महापालिकेचा मास्टरप्लॅन

Nashik Simhastha Kumbh Mela | आखाडे, दोन हजार खालसे, आरोग्य, पार्किंगसह २४ तास सुरक्षेची व्यवस्था
Nashik Kumbh Mela 2027
Nashik Kumbh Mela 2027 file photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळ्याची पहिली पर्वणी वर्षभरावर येऊन ठेपल्याने नाशिक महापालिका प्रशासन आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ प्राधिकरणाने तपोवनातील प्रस्तावित 'साधुग्राम' उभारणीच्या नियोजनाला वेग दिला आहे. प्रयागराज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर यंदा नाशिकमध्ये साधू-महंत, आखाडे आणि खालशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा तब्बल १३८० एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Road Collapse | नाशिक शहरातील रस्त्यांची 'खोखली' मालिका अद्यापही सुरूच

साधुग्रामचा विस्तार तपोवनापुरता मर्यादित न ठेवता स्वामिनारायण मंदिरापासून नांदूर गावाच्या शिवेपर्यंत करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. सिंहस्थातील पहिली पर्वणी ३१ ऑगस्ट २०२७ रोजी होणार असून, पुढील महिन्यात ३१ ऑक्टोबरला राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

त्यामुळे कुंभमेळ्यासाठी सुरू असलेल्या सुमारे ३५ हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांसोबतच साधुग्रामच्या नियोजनालाही प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. सन २००३ मध्ये १०५ एकर, तर २०१५ मध्ये ३२३ एकर क्षेत्रावर साधुग्राम उभारण्यात आले होते. मात्र, यंदा प्रयागराजच्या धर्तीवर मोठ्या संख्येने साधू-महंत आणि भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. आठ ते दहा कोटी भाविकांच्या संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर दोन हजारांहून अधिक खालसे दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साधुग्रामसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता भासणार आहे.

तीन प्रमुख आखाड्यांसाठी स्वतंत्र सेक्टर

प्रस्तावित साधुग्राममध्ये निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर या तीन प्रमुख आखाड्यांसाठी स्वतंत्र सेक्टर उभारले जाणार आहेत. त्यासाठी सुमारे १०३ एकर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक आखाड्याला स्वतंत्र भूखंड देण्यासोबतच दोन हजार खालशांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

३७७ एकर जागेवर आरक्षण

तपोवन व परिसरात सध्या साधुग्रामसाठी ३७७ एकर जागेचे आरक्षण आहे. त्यापैकी २८०.४६ एकर साधुग्रामसाठी, तर ९६.०५ एकर संलग्न सुविधांसाठी आरक्षित आहे. यातील ९४.०७ एकर जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. उर्वरित २८३ एकर क्षेत्राचे संपादन बाकी आहे. त्यापैकी १३ एकर क्षेत्रात जनार्दनस्वामी मठ व लक्ष्मीनारायण मंदिराची लक्ष्मी गोशाळा आहे, तर १.५ एकर क्षेत्रात अभिन्यास मंजूर आहे. उर्वरित २६८ एकर जागा संपादित केली जाणार आहे. त्यासाठी २,२६७ कोटी रुपयांच्या निधीसह प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.

Nashik Kumbh Mela 2027
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या वीज बचतीचा लागणार हिशोब; 'महाऊर्जा'कडून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

अशा असणार सुविधा

  • साधू-संतांसाठी भोजनालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य केंद्र, पार्किंग, स्वच्छतागृहे आणि सीसीटीव्ही यंत्रणेसह २४ तास सुरक्षाव्यवस्था उभारण्यात येणार आहे.

  • प्रवचन, धार्मिक सभा आणि यज्ञासाठी मोठे मंडप उभारले जातील.

  • विशेष वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका चोवीस तास तैनात ठेवण्यात येणार असून, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाची स्वतंत्र यंत्रणाही कार्यरत राहणार आहे.

एक हजार एकर विस्तार न्यायालयाच्या कक्षेत

तपोवनातील सध्याच्या साधुग्रामच्या विस्तारासाठी सुमारे एक हजार एकर अतिरिक्त जमीन भाडेतत्त्वावर घेण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. ही जागा नांदूरच्या हदीपर्यंत आहे. मात्र, भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने बळजबरीच्या भूसंपादनास स्थगिता दिल्याने विस्तारित साधुग्रामचे भवितव्य न्यायालयीन निर्णयावर अवलंबून आहे.

"सिंहस्थात साधू-महंतांसह भाविकांची संख्या मोठी असल्याने तपोवनात १३८० एकर जागेवर साधुग्राम उभारण्याचे नियोजन आहे. पायाभूत सुविधांचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून, आठवडाभरात तो सिंहस्थ प्राधिकरणाला सादर केला जाणार आहे."

— प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, नाशिक महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news