Nashik Road Collapse | नाशिक शहरातील रस्त्यांची 'खोखली' मालिका अद्यापही सुरूच

Nashik Road Collapse | सुदर्शन कॉलनीतील रस्त्याला भगदाड : पाइपलाइन उघडी पडून अपघाताचा धोका
Nashik Road Collapse
Nashik Road Collapse
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील रस्ते खचण्याच्या घटनांना आळा बसत नसल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. इंदिरानगरातील सुदर्शन कॉलनी, सुदर्शन लॉन्सजवळ, हुंबा डेअरीसमोरील रस्त्यावर मोठे भगदाड पडले असून, त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे भगदाड वाहनचालकांच्या दृष्टीस सहज पडत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे.

Nashik Road Collapse
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या वीज बचतीचा लागणार हिशोब; 'महाऊर्जा'कडून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

सुदर्शन कॉलनीतील या रस्त्याखाली पाइपलाइन आणि ड्रेनेज लाइन आहे. अंतर्गत भागातून रस्ता खचल्याने मोठे भगदाड निर्माण झाले असून, त्यातून पाइपलाइन उघडी पडली आहे. या पाइपलाइनमधून पाण्याचा प्रवाह सुरू असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याचा आणखी भाग खचण्याची शक्यता निर्माण झाली असून, परिस्थिती गंभीर होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

या मार्गावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात दुचाकी तसेच चारचाकी वाहने ये-जा करतात. भगदाडाभोवती पुरेशी सुरक्षित व्यवस्था अथवा ठोस सूचना फलक नसल्यास रात्रीच्या वेळी वाहनचालकांना त्याचा अंदाज येणे कठीण होऊ शकते. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्यापूर्वीच रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Nashik Road Collapse
Nashik Municipal Corporation | गणेशोत्सवापूर्वी नाशिक खड्डेमुक्त होणार? मनपाचा 18,423 खड्डे बुजवल्याचा दावा

रस्ते खचण्याच्या घटनांवर प्रश्नचिन्ह

शहरात रस्ते खचण्याच्या घटना सातत्याने समोर येत असल्यामुळे महापालिकेच्या रस्ते आणि भूमिगत पाइपलाइन व्यवस्थेच्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी नवश्या गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे भगदाड पडून, त्यात डंपर अडकल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता सुदर्शन कॉलनीत पुन्हा रस्ता खचल्यामुळे शहरातील रस्त्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

रस्ता मजबुतीवर द्यावा भर

रस्त्याखालील पाइपलाइन, ड्रेनेज किंवा इतर भूमिगत सुविधांमध्ये बिघाड झाल्यानंतर त्याचा परिणाम रस्ता मजबुतीवर होतो. त्यामुळे केवळ भगदाड बुजविण्याऐवजी त्यामागील कारणे शोधून पाइपलाइनची दुरुस्ती आणि त्यानंतर रस्त्याचे मजबुतीकरण करणे आवश्यक आहे. अपघात घडण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने या भगदाडाची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि परिसर सुरक्षित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news