Ashok Kharat case: अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट! रुपाली चाकणकर आज SIT समोर; चौकशीत होणार मोठे खुलासे?

भोंदू अशोक खरात प्रकरणात आज राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर विशेष तपास पथकासमोर चौकशीसाठी हजर राहणार आहेत.
Ashok Kharat case Rupali Chakankar SIT inquiry Nashik
Ashok Kharat case Rupali Chakankar SIT inquiry Nashikfile photo
Published on
Updated on

Ashok Kharat case Rupali Chakankar

नाशिक: भोंदू अशोक खरात प्रकरणात आज नाशिकमध्ये सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळणार आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर आज विशेष तपास पथकासमोर (SIT) चौकशीसाठी हजर राहणार आहेत. अशोक खरातने स्थापन केलेल्या 'श्री शिवनिका' संस्थेच्या विश्वस्त मंडळावर सलग दोन वेळा सदस्य राहिल्यामुळे चाकणकर यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खरातवर लैंगिक शोषण, जादूटोणा विरोधी कायदा आणि आर्थिक फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांचे जुने संबंध आता तपासाच्या केंद्रस्थानी आले आहेत. खरातची पाद्यपूजा करतानाचे आणि जाहीर व्यासपीठावर त्याचे कौतुक करतानाचे रुपाली चाकणकर यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने राज्यभर चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आणि अखेर त्यांना महिला आयोग अध्यक्षपदासह पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही राजीनामा द्यावा लागला.

Ashok Kharat case Rupali Chakankar SIT inquiry Nashik
Ashok Kharat Case | फार्म हाऊसवरील भोंदू खरातचा काळा खेळ उघड! व्हिडीओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य; स्वयंपाक्याने केले चित्रीकरण

खरातच्या पतसंस्थेत रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांच्या नावाने खाती उघडल्याचे समोर आल्यानंतर तपासाची व्याप्ती वाढली आहे. प्रतिभा चाकणकर यांच्या चौकशीनंतर आता खुद्द रुपाली चाकणकर यांची चौकशी होत असल्याने हा तपास निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याची चर्चा आहे.

राज्यातील अनेक महिला नेत्यांनी खरातसोबतच्या निकट संबंधांवरून रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी उघडपणे केली होती. 'दीड महिन्यांहून अधिक काळ चौकशी का झाली नाही?' असा सवाल उपस्थित करत तपास यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. शिर्डीतील पीडित तरुणीच्या प्रकरणात खरातला वाचवण्यासाठी अहवाल मागवून पोलिसांवर दबाव आणल्याचा गंभीर आरोपही चाकणकर यांच्यावर आहे. महिला आयोगाच्या पदाचा गैरवापर करून खरातला संरक्षण देण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास आजच्या चौकशीतील मुख्य मुद्दा असेल.

चाकणकर पुण्याहून नाशिकला निघण्यापूर्वी काय घडलं?

राजकीय दबाव आणि सामाजिक संताप या पार्श्वभूमीवर आजची चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, पुण्याहून नाशिकला निघण्यापूर्वी काही नाट्यमय घडामोडी घडल्या:

सकाळी ६ वाजता: एक कार चाकणकरांच्या बंगल्यावर दाखल झाली.

सकाळी ७ वाजता: चाकणकर बंगल्याबाहेर पडल्या.

सफेद रंगाच्या कारमधून त्या प्रवासाला निघाल्या, मात्र 'पुढारी न्यूज'च्या कॅमेऱ्यात कैद झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आपला मार्ग बदलला.

वाटेत त्यांनी गाडीही बदलली आणि ४ ते ५ वेळा गाडी थांबवून अखेर नाशिकच्या दिशेने प्रयाण केले.

Ashok Kharat case Rupali Chakankar SIT inquiry Nashik
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news