Ashok Kharat Case | फार्म हाऊसवरील भोंदू खरातचा काळा खेळ उघड! व्हिडीओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य; स्वयंपाक्याने केले चित्रीकरण

Ashok Kharat Case |
Ashok Kharat Case | फार्म हाऊसवरील भोंदू खरातचा काळा खेळ उघड! व्हिडीओत महिलांबरोबर आक्षेपार्ह कृत्य; स्वयंपाक्याने केले चित्रीकरण
Published on
Updated on

नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता त्याच्या फार्महाऊसवरील कथित काळे कारनामे उघडकीस आले आहेत. खरातच्या फार्म हाऊसवर काम करणार्‍या स्वयंपाकी कर्मचार्‍याने घरातील काही संशयास्पद हालचालींचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या व्हिडीओमध्ये खरात महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

विशेष म्हणजे, या स्वयंपाकी कर्मचार्‍याला खरातच्या जवळच्या एका व्यक्तीने मुद्दाम त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी फार्महाऊसवर कामावर ठेवले होते, हेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर खरातच्या ऑफिसबॉयनेही अनेक महत्त्वाची माहिती उघड करत फार्महाऊसवरील संशयास्पद हालचालींचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथकाच्या हाती लागले असून, त्यातून आणखी गंभीर आणि धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला चौकशीदरम्यान उत्तर देण्यास टाळाटाळ करणारा खरात आता ‘काही आठवत नाही’, अशी भूमिका घेत असल्याने त्याची गजनी ट्रिक चर्चेचा विषय ठरली आहे. यापूर्वीही प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत तपास चुकवण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

अटकेच्या दिवशीच जमीन व्यवहार

भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक वळण समोर आले आहे. पोलिसांनी अशोक खरातला अटक केलेल्या दिवशीच त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या नावे नवी मुंबईजवळील उरण येथे मोठा जमीन व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. उरण परिसरात तब्बल 20 गुंठे जमीन 58 लाख 50 हजार रुपयांना खरेदी करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी अशोक खरातला अटक झाली, त्याच दिवशी हा व्यवहार अधिकृतरीत्या कागदोपत्री पूर्ण करण्यात आला. एकीकडे पत्नी कल्पना खरात शिर्डीतील भूखंड बळकावण्याच्या प्रकरणात फरार असून राहाता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

खरातला मदत करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई : बावनकुळे

भोंदू खरातला मदत करणार्‍या महसूल अधिकार्‍यावर निश्चितच कारवाई होईल व त्यांना बडतर्फ करण्यात येईल. अंतिम अहवाल प्राप्त होताच कठोर पावले उचलली जातील. तसेच, या प्रकरणात इतर विभागातील अधिकारी सहभागी असतील तरी त्यांची माहिती एसआयटीकडे पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. ‘कोणीही दोषी सुटणार नाही,’ महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.भोंदू अशोक खरातने काळ्या कारनाम्यांनी उभारलेल्या साम्राज्यामागील धागेदोरे आता उलगडू लागले असून, त्याला मदत करणार्‍या बड्या अधिकार्‍यांवरही कडक कारवाईचे संकेत मिळत आहेत.

खरातकडून हवेतून काजू कतली काढून कोट्यवधींची लूट!

अंधश्रद्धेच्या नावाखाली लोकांची मानसिक फसवणूक करत कोट्यवधी रुपये उकळणार्‍या भोंदू अशोक खरातच्या कारनाम्यांचा संपूर्ण घटनाक्रम उघडकीस आला असून, समाजमनाला हादरवणारा हा प्रकार ठरत आहे. 2017 मध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंटशी संपर्क साधताना खरातने सुरुवातीला अत्यंत विश्वासार्ह वर्तन करत त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर चमत्कार दाखवण्याच्या नावाखाली मोकळा हात दाखवत हवेतून काजू कतली काढल्याचा बनाव केला आणि ‘हा प्रसाद’, असे म्हणत संबंधित सीएला प्रभावित केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news