Rickshaw Driver Assault | पन्नास रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला

Rickshaw Driver Assault | मुंबई नाका परिसरातील घटना; दोघांवर गुन्हा
Crime News
Rickshaw Driver Assault | पन्नास रुपयांच्या भाड्यावरून झालेल्या वादातून रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
रिक्षाभाड्यावरून झालेल्या वादातून दोन अज्ञात प्रवाशांनी रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घालून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली. वडाळा नाका येथे जाण्यासाठी प्रतिसीट ५० रुपये भाडे सांगितल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले. याबाबत मुंबई नाका पोलिस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदावरून उबाठा आणि काँग्रेसमध्ये वाढले मतभेद

रितेश मराठे (२४, रा. पवननगर) हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते शनिवारी (दि. १७) मध्यरात्रीनंतर २ च्या सुमारास त्यांचा भाचा हर्षल सुधीर माने याच्यासह ठक्कर बाजार येथून प्रवासी घेऊन गडकरी चौकात आले होते.

प्रवाशांना इच्छितस्थळी सोडल्यानंतर ते घराकडे परतत असताना मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील रुची हॉटेलसमोर दोन अनोळखी व्यक्तींनी हात दाखवून त्यांची रिक्षा थांबवली होती.
दोघांनी आपल्यासोबतचे सामान घेऊन वडाळा नाका येथे सोडण्यास सांगितले होते.

Crime News
Nashik- नाशिक बनणार 'एस सिटी'! महापौर : 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'कडे प्रस्ताव पाठवणार

रिक्षाचालक मराठे यांनी प्रतिसीट ५० रुपये भाडे होईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, भाड्याच्या रकमेवरून दोघांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर संशयितानी मराठे यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यातील एकाने रस्त्यावरील दगड उचलून मराठे यांच्या डोक्यात घातला.

या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. हल्ल्यानंतर जखमी मराठे यांना भाच्याने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. उपचारानंतर मराठे यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन अज्ञात संशयिताविरुद्ध गंभीर दुखापत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news