Nashik Real Estate Repo | दसरा-दिवाळीत घर घेण्याचं स्वप्न महागणार? RBI च्या रेपो रेट वाढीमुळे नाशिकच्या बिल्डरांमध्ये चिंता

Nashik Real Estate Repo | रेपो रेट वाढल्यामुळे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात पसरली चिंता
Real Estate
Real EstatePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दसरा-दिवाळीसह सणासुदीच्या काळात घरखरेदीला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये २५ बेसिस पॉइंट्सची वाढ करून तो ५.५० टक्क्यांवर नेल्याने नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राची चिंता वाढली आहे. विशेषतः प्रथमच घरखरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या गृहकर्जाचा हप्ता वाढण्याची शक्यता असल्याने, घर घेण्याचा निर्णय पुढे ढकलला जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

Real Estate
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत 1618 पदांची जम्बो भरती! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार

सणासुदीचा काळ हा रिअल इस्टेट क्षेत्रासाठी महत्त्वाचा मानला जातो. दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर घर, सदनिका खरेदीला ग्राहकांकडून प्राधान्य दिले जाते. त्यामुळे या काळात विकासकांकडून विविध योजना, सवलती आणि ग्राहकांसाठी आकर्षक आर्थिक पर्याय उपलब्ध करून देण्याची तयारी केली जाते. नाशिकमध्येही आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर गृहप्रकल्पांमध्ये ग्राहकांची चौकशी आणि प्रत्यक्ष खरेदी वाढण्याची अपेक्षा आहे.

मात्र, त्याचवेळी रेपो दरवाढीचा निर्णय झाल्याने बाजारपेठेतील उत्साहावर व्याजदराचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गृहकर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी व्याजदर हा घराच्या एकूण खर्चातील महत्त्वाचा घटक आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि प्रथमच घर घेणारे ग्राहक मासिक हप्त्याचे गणित मांडून घरखरेदीचा निर्णय घेतात.

व्याजदर वाढल्यास कर्जाच्या परतफेडीचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे सणासुदीच्या काळात घर घेण्याचे नियोजन केलेल्या काही ग्राहकांकडून निर्णयाचा फेरविचार किंवा खरेदी काही काळ पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रेपो दरवाढीचा परिणाम केवळ घरखरेदीदारांपुरता मर्यादित राहणार नसून, विकासकांच्या वित्तपुरवठ्याच्या खर्चावरही होण्याची शक्यता आहे. प्रकल्पांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा खर्च वाढल्यास प्रकल्पांचे आर्थिक नियोजन, रोख प्रवाह आणि बांधकामाचा खर्च यावर दबाव निर्माण होऊ शकतो.

Real Estate
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत 1618 पदांची जम्बो भरती! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार

जमीन, बांधकाम साहित्य, मजुरी आणि इतर इनपुट खर्चातील वाढीच्या पार्श्वभूमीवर वित्तपुरवठ्याचा खर्च वाढणे हे विकासकांसाठी आणखी एक आव्हान ठरू शकते. मात्र, नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राची मागणी पूर्णपणे व्याजदरावर अवलंबून नसल्याचेही चित्र आहे.

नाशिकमध्ये घर घेण्याची हीच संधी:

नाशिकमध्ये शहराचा विस्तार, नवीन रस्ते व पायाभूत सुविधा, औद्योगिक गुंतवणूक आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिअल इस्टेट क्षेत्राला मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत. शहराच्या विविध भागांत नवीन गृहप्रकल्प सुरू असून, परवडणाऱ्या घरांपासून उच्चभ्रू सदनिकांपर्यंत विविध पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे मागणीची मूलभूत स्थिती मजबूत असली तरी ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर व्याजदर वाढीचा परिणाम होणे ही क्षेत्रासाठी चिंतेची बाब आहे.

"सणासुदीच्या काळात घरखरेदीला चालना मिळण्याची अपेक्षा असताना व्याज दरवाढीचा परिणाम गृहकर्जाच्या खर्चावर होऊ शकतो. विशेषतः प्रथमच घर घेणारे ग्राहक आणि मध्यमवर्गीय कुटुंंबे यांना याचा अधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. गृहस्वामित्वाची परवड कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. रेपो दरवाढीचा परिणाम अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचताना संतुलित, टप्प्याटप्प्याने आणि पारदर्शक पद्धतीने होणे गरजेचे आहे. महागाईचा दबाव कमी झाल्यानंतर आरबीआयने आपल्या धोरणात्मक भूमिकेचा पुनर्विचार करावा."

- गौरव ठक्कर, अध्यक्ष, केडाई नाशिक मेट्रो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news