Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेत 1618 पदांची जम्बो भरती! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार

Nashik Municipal Corporation | मानधनावर 1618 वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी नियुक्त करणार
Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी कंबर कसली आहे. कुंभमेळ्याच्या काळात शहरात दाखल होणारे लाखो भाविक, साधू-संत, महंत आणि पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तब्बल १ हजार ६१८ अतिरिक्त वैद्यकीय व निमवैद्यकीय मनुष्यबळाची मानधनावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी २० कोटी २४ लाख रुपयांच्या खर्चास महासभेने मंजुरी दिली आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व! पाचही समित्यांच्या सभापती-उपसभापतींची बिनविरोध निवड

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार आहे. या कालावधीत संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव, साथरोग, अपघात तसेच विविध आपत्कालीन परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. त्यासाठी महापालिकेच्या विद्यमान रुग्णालयांमधील आरोग्य सुविधा बळकट करण्याबरोबरच नवीन रुग्णालये व उपरुग्णालये कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

तसेच शहरातील प्रमुख ठिकाणी आणि गोदाघाट परिसरात तात्पुरती रुग्णालये, आरोग्य केंद्रे आणि अतिदक्षता विभाग उभारण्याची तयारी करण्यात येत आहे. या संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या संचालनासाठी सध्याचे मनुष्यबळ अपुरे पडणार असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी मानधनावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या महासभेत जादा विषयात सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपा महासभेत गदारोळ! बेंच अन् खेळणी खरेदीत 43 लाखांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

२०.२४ कोटींच्या निधीतून खर्च:

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाकडून महापालिकेच्या विकासकामांसाठी मंजूर झालेल्या निधीत सार्वजनिक आरोग्य विभागासाठी २० कोटी २४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याच निधीतून अतिरिक्त मनुष्यबळाच्या नियुक्तीचा खर्च भागवण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णसेवा, साथरोग नियंत्रण, आरोग्य सर्वेक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ महत्त्वाचे ठरणार आहे.

डॉक्टरांसह नर्सिंग स्टाफची मोठी गरज:

महापालिकेच्या प्रस्तावानुसार, अतिरिक्त मनुष्यबळामध्ये १२७ विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी, १४१ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी, २०१ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, २३३ स्टाफ नर्स, १६५ एएनएम, १९८ औषध निर्माण अधिकारी आणि तब्बल ५५३ सहाय्यक कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे एकूण १ हजार ६१८ कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती केली जाणार आहे. यापैकी १ हजार ५४ कर्मचाऱ्यांची तीन महिन्यांसाठी, तर ५६४ कर्मचाऱ्यांची चार महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने अथवा मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष गरजेनुसार या मनुष्यबळाच्या संख्येत बदल होण्याची शक्यताही प्रस्तावात नमूद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news