Nashik Road News | नाशिकरोडच्या अतिक्रमण कारवाईवरून मनपा स्थायी समितीत गदारोळ; प्रादेशिक वादाचे पडसाद!

Nashik Road News | राजकीय दबावाखाली मराठी व्यावसायिकांवर कारवाईचा आरोप
Encroachment Removal Drive
Encroachment Removal DrivePudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकरोड परिसरातील अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान नगरसेवक कैलास मुदलीयार यांच्या उपस्थितीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या कारवाईवरून प्रादेशिक वाद उभा राहिल्याचे चित्र महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी (दि. २४) दिसले.

Encroachment Removal Drive
Nashik Ganesh Visarjan | नाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत कलम 163 लागू; विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी!

राजकीय दबावाखाली मराठी व्यावसायिकांवर अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप समिती सदस्या जयश्री गायकवाड यांनी करीत संपूर्ण कारवाईचा लेखी अहवाल सादर करण्याची मागणी केली. मात्र, या चर्चेला प्रादेशिक वादाचे स्वरूप देऊ नये, असे सांगत स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांनी गायकवाड यांना शब्द मागे घेण्यास सांगितले.

तसेच संपूर्ण प्रकरणाचा अहवाल पुढील स्थायी समिती बैठकीत सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सभापती सानप यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक गुरुवारी पार पडली. नाशिकरोड येथील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या मुद्द्यावरून या बैठकीत जोरदार चर्चा रंगली होती.

कारवाई सुरू असताना नगरसेवक घटनास्थळी कसे उपस्थित राहू शकतात, असा प्रश्न गायकवाड यांनी उपस्थित केला. तसेच संबंधित नगरसेवकाच्या दबावामुळे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नाशिकरोड येथील रेजिमेंटल प्लाझा परिसरात पार्किंगसाठी घेतलेल्या जागेत अनाधिकृत व्यवसाय सुरू असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला.

'दादागिरी खपवून घेणार नाही'

अतिक्रमण निर्मूलन कारवाईनिमित्त मराठी व्यावसायिकांवर राजकीय दबावातून अन्याय होत असल्याचा आरोप करीत गायकवाड यांनी अशा प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यावर सभापती सानप यांनी आक्षेप घेतला. चर्चेला प्रादेशिक वादाचे स्वरूप देऊ नका आणि संबंधित शब्द मागे घ्या, असे त्यांनी स्पष्ट केले. प्रकरणाची वस्तुस्थिती प्रशासनाच्या अहवालातून स्पष्ट होईल, अशी भूमिका घेत सभापती सानप यांनी संपूर्ण कारवाईचा सविस्तर अहवाल पुढील स्थायी समिती बैठकीत सादर करण्याचे निर्देश दिले.

Encroachment Removal Drive
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

गमणे - सानप यांच्यात खडाजंगी

सभेत बोलण्याच्या संधीवरून किरण गमणे आणि सभापती मच्छिंद्र सानप यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. गमणे बोलण्यासाठी उठल्यानंतर सभापतींनी त्यांना खाली बसण्यास सांगितले. त्यावर, सदस्यांचा आवाज अशा पद्धतीने दाबता येणार नाही आणि प्रत्येक सदस्याला आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळाली पाहिजे, असा आक्षेप गमणे यांनी घेतला. त्यावर सभापती सानप यांनी आपण सर्व सदस्यांना बोलण्याची संधी दिल्याचे स्पष्ट केले.

मॉलचा पार्किंग मुद्दा ऐरणीवर

चर्चेमध्ये किरण गमणे यांनी शहरातील मॉलच्या पार्किंग व्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. मॉलमध्ये ग्राहकांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था करणे अपेक्षित असताना, सिटी सेंटरसह काही मॉलमध्ये पार्किंगसाठी शुल्क आकारले जाते. त्यामुळे काही ग्राहक आपली वाहने रस्त्यावर उभी करून मॉलमध्ये जात असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचा दावा गमणे यांनी केला.

अशा मॉलधारकांची तपासणी करून नियमभंग आढळल्यास कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळे वाहने रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. याचवेळी, चौकात सुरू असलेल्या अनधिकृत पावभाजीच्या गाड्यांवर कारवाई न करता थेट दुकानात जाऊन ट्रॉली उचलून नेण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news